मुंबई - 'मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावा लागलं', असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी केलं होते. त्यावरुन आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांना मातृशोक झाला असून, त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. मात्र, त्यांनी केलेल्या वक्तव्यावर विधानसभेमध्ये 'कोणी, कोणाच्या, कोठे दगड आणि धोंडा ठेवला आहे, हे नक्की सांगेन', असा चिमटा अजित पवारांनी काढला ( ajit pawar taunt chandrakant patil ) आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
महाराजांची प्रतिमा असलेली वाहन अडवतात? -तिरुपती देवस्थान संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होत असून, यावेळी मध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांच्या गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असली असती हटवली जाते असा या व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबत बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर हे तिरुपती देवस्थानचे ट्रस्टी आहेत. त्याप्रकरणी एक ते दोन दिवसांमध्ये बोलून याबाबतचे गैरसमज दूर केले जातील. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून काही गैरसमज दूर असतील, तर ते दूर करावे, असे देखील अजित पवारांनी सूचित केलं आहे.
'अतिवृष्टी ठिकाणी पाहणी दौरा करणार' - अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, यामुळे शेतकरी तसेच सामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. त्यासाठी राज्य सरकारने तत्परतेने मदत करणे आवश्यक आहे. लवकरच आपण अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी दौरा करणार आहे. पालकमंत्री नसल्याने अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच, स्थानिक प्रतिनिधींनी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थिती असलेल्या ठिकाणांची पाहणी केल्यास अधिवेशनातही राज्यातील परिस्थितीचा आढावा घेता येतो. मात्र, या अधिवेशनात पुढे ढकलत असल्याने राज्य सरकारवर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'निवडणुका सप्टेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलायचे असतील तर...' - सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक निर्णयाला स्थगिती देण्यात आली. यासोबतच सहकार क्षेत्रातील निवडणुका देखील नवीन राज्य सरकारने पुढे ढकलल्या. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना तर केवळ चार प्रतिनिधींची निवडणूक होती. मात्र, तीही राज्य सरकारने जाणून-बुजून पुढे ढकलल्या. निवडणूक प्रक्रिया सुरु असलेल्या संस्थांच्या प्रक्रिया पुढे सुरु ठेवा, ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियाच सुरु झाली नसेल. त्या ठिकाणच्या निवडणुका सप्टेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलायचे असतील, तर त्यांना काही हरकत नाही, असेही अजित पवारांनी सांगितलं.