मुंबई - राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळ, शेतीचे प्रश्न, शेतकरी कर्जमाफी आदी मागण्यासाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.
शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांची विधिमंडळ पायऱ्यांवर निदर्शने
शेतकरी कर्जमाफी, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, आदी मागण्यासाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.
निदर्शने
विधिमंडळ परिसरात शासनाने आज मराठी भाषा दिन साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, छगन भुजबळ यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या, छावण्या बंद लावण्या सुरू, अशा घोषणा देण्यात आल्या.