मुंबई- राज्यातील औद्योगिक वसाहतीमधील काही उद्योजकांवर हल्ले झाल्याच्या घनटा नुकत्याच समोर आल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना एक पक्ष लिहले आहे. औरंगाबादमध्ये उद्योजकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीवर परिणाम होईल. त्यामुळे या गंभीर मुद्द्याकडे लक्ष घालून त्वरित कारवाई करावी, असे विनंती पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
गेले काही दिवस औरंगाबाद मधील उद्योजकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. हे हल्ले जर रोखले गेले नाहीत तर, महाराष्ट्राबाहेर याच विपरीत चित्र निर्माण होईल. राज्यात निर्माण होत असलेल्या रोजगारावर गदा येईल. त्यामुळे यासंबंधी तातडीने पावले उचलून कारवाई करावी, अशी विनंती फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. 8 ऑगस्टला भोगले उद्योग समूहाचे संचालक नित्यानंद भोगले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दाखला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात दिला आहे.