मुंबई - मालाड पश्चिम येथे आज सकाळी झाडाची फांदी अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाला. शैलेश मोहनराव राठोड (३८) असे या व्यक्तीचे नाव आहे.
मालाडमध्ये झाडाची फांदी अंगावर पडून तरूणाचा मृत्यू - झाडाची फांदी
मान्सूनपूर्व पावसामुळे शहरात अनेक पडझडीच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना आज मालाडमध्ये घडली. मालाड पश्चिम येथे आज सकाळी झाडाची फांदी पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे.
संग्रहित छायाचित्र
मान्सूनपूर्व पावसामुळे शहरात अनेक पडझडीच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना आज मालाडमध्ये घडली. मुंबई पोलीस कंट्रोलकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथील नारीयलवाला कॉलनी, एसव्ही रोड, विजयकर वाडी येथे साडे सहा वाजता झाडाची फांदी पडून एक जण जखमी झाला. यानंतर शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.