मुंबई - सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नंदा कदम असे मृत महिलेचे नाव असून वाशी येथील पालिका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू, एकूण मृतांची संख्या ७ - crash
१४ मार्चला संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील असलेल्या ‘हिमालय’ पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेवेळी सीएसएमटीसमोरील रस्त्यावर ‘रेड सिग्नल’ लागल्याने पुलाखालील वाहने नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
नंदा कदम यांच्या मृत्यूमुळे या अपघातातील मृतांची संख्या ही ७ झाली आहे. १४ मार्चला संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील असलेल्या ‘हिमालय’ पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेवेळी सीएसएमटीसमोरील रस्त्यावर ‘रेड सिग्नल’ लागल्याने पुलाखालील वाहने नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
या पुलाखालून जे-जे फ्लायओव्हरकडे रस्ता जातो. दुर्घटना घडली त्यावेळी या पुलाखालून एकच टॅक्सीचालक व त्याची गाडी उभी होती. पुलाचा स्लॅब त्याच्या टॅक्सीच्या समोरील भागावर कोसळला आणि टॅक्सीचालक बचावला.