महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप - Mumbai Ganesh festival

मुंबईत आज दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. समुद्राला भरती असल्याने सायंकाळनंतर मोठ्या संख्येने गणेशाचे विसर्जन करण्यता आले.

मुंबईत दीड दिवसांच्या गणेश मूर्त्यांचे विसर्जन

By

Published : Sep 3, 2019, 4:47 PM IST

मुंबई - आपल्या लाडक्या बाप्पाची मुंबईकरांनी सोमवारी मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली. आज भाविकांनी दीड दिवसाच्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. मात्र, आज समुद्राला भरती असल्याने सायंकाळनंतर मोठ्या संख्येने विसर्जन करता येणार आहे.

मुंबईत दीड दिवसांच्या गणेश मूर्त्यांचे विसर्जन

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अकरा दिवस मुंबईकर तल्लीन होऊन बाप्पाची सेवा करतात. गणेशोत्सवा दरम्यान दीड, पाच, सात आणि अकरा दिवसांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. मुंबईत आज दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यासाठी पालिकेने चौपाटीवर योग्य त्या सोयी सुविधा पुरवल्या आहेत. विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत.

दिड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात असतानाच दुपारी २ वाजून ४१ मिनिटांनी समुद्राला भरती आली. यावेळी ४.५४ मीटरच्या लाटा उसळणार असळल्या. यावेळेत समुद्रात जाणे जीवावर बेतू शकते. यामुळे लाईफ गार्डची नियुक्ती करण्यात आली होती. दुपारी भरती असल्याने गणेशभक्त कमी प्रमाणात विसर्जनासाठी आले. भरती ओसरल्यावर सायंकाळी विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांची संख्या वाढताना दिसली.

१५३ गणेश मूर्तींचे विसर्जन -

दीड दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जन केले जात झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईत १५३ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी ५३ मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details