मुंबई - उत्तर प्रदेशमध्ये 4 जणांचा खुनाच्या गुन्ह्यासह १८ गंभीर गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या आरोपीला मुंबईच्या साकिनाका पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेशचे पोलीस अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. मुंबईत नाव बदलून राहणाऱ्या आतिक मोहमद रौफ शेख या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाली केले आहे.
उत्तर प्रदेशात ४ खून करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक - police
आरोपीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. गेल्या काही महिन्यांपासून आतिक शेख हा मुंबईतील साकिनाका परिसरातील झोपडपट्टीत नाव बदलून राहत होता. उत्तर प्रदेशमधील प्रतापगड पोलिसांच्या हद्दीत या आरोपीने ४ खून, ७ दरोडे व खुनाचा प्रयत्न असे १८ गंभीर गुन्हे केले होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. गेल्या काही महिन्यांपासून आतिक शेख हा मुंबईतील साकिनाका परिसरातील झोपडपट्टीत नाव बदलून राहत होता. उत्तर प्रदेशमधील प्रतापगड पोलिसांच्या हद्दीत या आरोपीने ४ खून, ७ दरोडे व खुनाचा प्रयत्न असे १८ गंभीर गुन्हे केले होते. गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेश पोलीस या आरोपीच्या शोधत होते मात्र काही केल्या आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अटक केलेला आरोपी हा उत्तर प्रदेशमधील प्रतापगड मधल्या तौकिर या गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या होता. मुंबईतील साकिनाका परिसरात तो आफ्रॉज शेख या नावाने राहत होता. या नावाचे त्याने बनावट कागदपत्रे बनविल्याचे पोलीस तापासत समोर आले असून सध्या मुंबई पोलिसांकडून उत्तर प्रदेश पोलिसांकडे या आरोपीचा ताबा देण्यात आला आहे.