..त्यामुळे १ नोव्हेंबरला राज्य मंत्रिमंडळ काळ्या फिती बांधून कामकाज करणार - जयंत पाटील - राज्य मंत्रिमंडळ काळ्या फिती बांधून कामकाज करणार
सीमा भागातील मराठी बांधवांना आपला पाठिंबा म्हणून महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
मुंबई -माझ्या सहकाऱ्यांनो.. सीमा भागातील मराठी बांधवांना आपला पाठिंबा म्हणून १ नोव्हेंबर रोजी आपणही काळ्या फिती बांधत सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करू, दडपशाहीचा धिक्कार करू!असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे, असेही जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या सर्व पदाधिकारी, युवक, युवती, इतर सेल व कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यामध्ये सहभागी होण्याची विनंती केली आहे.