महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Female Crime Increasing Reason महिला दिवसेंदिवस आक्रमक होऊन का करतायेत हत्येसारखे गंभीर गुन्हे? जाणून घ्या मानसोपचार तज्ज्ञांचे मत - Psychiatrist Dr Nishikant Vibhute Mumbai

दिवसेंदिवस महिला Women's crime increasing causes इतक्या आक्रमक होऊन टोकाचं पाऊल का उचलू लागल्या number of crimes committed by women on increasing आहेत? याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निशिकांत विभुते Psychiatrist Dr. Nishikant Vibhute Mumbai  यांच्या ईटीव्ही भारतने बातचीत करून कारणे आणि बचावात्मक उपाय जाणून घेतले आहेत.

Female Crime Increasing Reason
महिला दिवसेंदिवस आक्रमक होऊन का करतायेत हत्येसारखे गंभीर गुन्हे?

By

Published : Aug 30, 2022, 8:44 PM IST

मुंबईगोरेगाव येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 30 वर्षीय महिलेला शनिवारी तिच्या प्रियकराचा गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात Aray police station गुन्हा दाखल करण्यात आला आणि महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मात्र, दिवसेंदिवस महिला Womens crime increasing causes इतक्या आक्रमक होऊन टोकाचं पाऊल का उचलू लागल्या number of crimes committed by women on increasing आहेत? याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निशिकांत विभुते Psychiatrist Dr. Nishikant Vibhute Mumbai यांच्या ईटीव्ही भारतने बातचीत करून कारणे आणि बचावात्मक उपाय जाणून घेतले आहेत. crimes committed by women rising

मुंबईतील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निशिकांत विभुते महिलांतर्फे होणाऱया गुन्ह्यांच्या कारणांची माहिती देताना


महत्त्वाकांक्षी महिला अधिक उग्रडॉ. निशिकांत विभुते यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले, बऱ्याच शिकलेल्या महिला आजकाल अत्याधुनिक काळात स्वातंत्र्य आणि स्वच्छंदपणे जीबीन जगणं पसंत करतात. त्यामुळे त्या कधी समाजापासून आणि कुटुंबापासून दूर राहतात. त्यातून निराशा आणि वैफल्य निर्माण झाल्याने महिला त्यातून एकत्र आत्महत्या आणि त्याला विरोधी प्रक्रिया म्हणून रागाच्या भरात हत्येसारखा गुन्हा करण्यास देखील मागे पडत नाही. महत्त्वाकांक्षी महिलेला एखादी गोष्ट मिळवायची आहे. त्यात अडथळा निर्माण झाल्यास महिलेला राग येतो आणि रागातून अशी घटना घडते. अशा महिलांचा भविष्याकडे लॉन्ग टर्म पाहण्याचा दृष्टिकोन नसतो. त्यांना शॉर्ट टर्म नोटीसवर वर्क आउट होतं का पाहूया अशी विचारसरणी असते. भविष्यात दूरदृष्टी विचार करून आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर काय परिणाम होईल याची पर्वा अशा महिलांना नसते.


वागणुकीत बदल वाटल्यास कौन्सलरचा सल्ला आवश्यकमहिला आणि सोबतच्या पुरुष या दोघांची विचार सरणी वेगवेगळी आहे. तिला विश्वासघात केला तर राग पटकन येतो आणि त्यातून टोकाची भूमिका ती घेऊ शकते. त्यावर उपाय म्हणजे घरच्यांनी अशा महिलेला वा व्यक्तीस घरात थांबवू शकतात. वेगळं होण्यापासून रोखू शकतात. वागणुकीत बदल वाटल्यास डॉक्टर, कॉन्स्युलरकडे नेऊन त्यावर उपाय जाणून घेतला पाहिजे. त्यांना एकाकीपणा वाटू देऊ नये. घरच्यांनी त्यांच्याशी संभाषण वाढवले पाहिजे. कुटुंबाने त्यांना पाठबळ देऊन तज्ज्ञांच्या मदतीने त्यांना होणारा त्रास समजून घेतला तर होऊ घातलेली समाजविघातक घटना घडण्यास अडथळा होऊ शकतो.


गोरेगावात काय घडली होती घटना? गोरेगाव पूर्व येथील तपेश्वर मंदिराजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. आरोपी महिला आणि पुरुषाचे अनेकदा भांडण होतं होते. तिने त्याचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह ऑटोरिक्षात सोडला. त्यानंतर तिने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. ऑटो रिक्षेमध्ये प्रेयसीने आपल्या जोडीदाराची हत्या केल्यानंतर लगेचच, मुंबईच्या आरे पोलिसांकडे ३० वर्षीय महिलेने आत्मसमर्पण केले. ही महिला एका 26 वर्षीय पुरुषाच्या प्रेमात पडली होती. संबंधित महिला सहा मुलांची आई असल्याचे तरुणाला माहीत होते, तरीही तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. काही कालावधी लोटल्यानंतर महिलेने लग्नाचा आग्रह धरू लागली. मात्र, तरुणाने टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर महिलेने हे पाऊल उचलले, अशी माहिती आरे पोलिसांनी दिली. प्रेमात आपली फसवणूक झाल्याचे महिलेला वाटले. त्यानंतर तिने प्रियकराला पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. मात्र मध्येच प्रियकराने गाडी दुसऱ्या रस्त्यावर वळवली. त्यानंतर महिलेला चांगलाच राग आला आणि तिने मागून तिचा दुपट्टा घेऊन तरुणाचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर महिलेने ऑटो तेथेच सोडली आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर आरे कॉलनीतील तपेश्वर मंदिराजवळ दिलेल्या ठिकाणी ऑटोची झडती घेण्यात आली. राइडिंग सीटवर बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या प्रियकराला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिस उपायुक्त ( डीसीपी ) म्हणाले की, आम्ही महिलेला भारतीय दंड संहितेच्या ( आयपीसी ) कलम 302 ( हत्या ) अंतर्गत अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.


आईने केली मुलीची हत्या पोटच्या मुलीची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या एका आईला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका आईने आपल्या 19 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अलीकडेच समोर आली आहे. अंधेरीतल्या पारशीवाडा परिसरामध्ये एका महिलेने आपल्या मनोरुग्ण मुलीची गळफास लावून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. 19 वर्षाची मुलगी मनोरुग्ण असल्याने मुलीची देखरेख करणं कठीण झालं होतं. तिचा त्रास आईला पहावत नव्हता, तिला सांभाळणं कठिण होत असल्याचं कारणास्तव त्या मातेने आपल्या पोटच्या मुलीला संपवलं.



पैशाच्या वादातून तरुणाचा महिलेने केला खून ४ महिन्यांपूर्वी पैशाच्या वादातून एका टपरीचालक तरुणाचा एका महिलेने खून केल्याची घटना वडाळा येथे घडली. दीपक ऊर्फ दादा शिवाजी कोळेकर ( वय ३५ वर्षे ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात मृताच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून त्या महिलेला अटक करण्यात आले आहे. शिवाजी आप्पा कोळेकर यांनी सोलापूर पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारी नुसार त्यांचा मुलगा दीपक याचा खून गावातील जयश्री भोसले या महिलेने केला.भोसले यांनी दीपक यास पाच लाख रुपये उसने दिले होते. या पैशावरूनच त्यांचा सतत वाद झाला होता. यातूनच हा खून झाल्याचे सांगण्यात आले.


फक्त पाच हजार रुपयांसाठी महिलेनं केली हत्या घाटकोपर रमाबाई नगर येथे एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात लाटणे मारून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. फक्त पाच हजार रुपये साठी केल्याची माहिती समोर आली आहे. २५ वर्षीय मयत महिलेचे नाव रेखा धोबी असे असून तिची हत्या करणारी महिला आरोपी ५१ वर्षीय ममता उके आहे.


हेही वाचाMumbai Crime Branch फोन आणि सेक्स व्हिडिओ कॉल सेंटरचा पर्दाफाश, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details