मुंबई - आज राज्यात २,८८६ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा २०,००,८७८ वर पोहचला आहे. राज्यात आज ५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५०,६३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ४५,६२२ ऍकक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१३ टक्के -
राज्यात आज ४,५८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १९,०३,४०८ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१३ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४०,१९,१८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,००,८७८ नमुने म्हणजेच १४.२७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,१२,०२३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ४५,६२२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
राज्यात १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, १८ जानेवारीला १,९२४ सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे
हेही वाचा-'कोरोनावरील लस सुरक्षितच, संकोच बागळू नका'