महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Minister Jayant Patil : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर समाधानी नाही - मंत्री जयंत पाटील - राज्यसभा मतदान जयंत पाटील प्रतिक्रिया

राज्यसभा निवडणुकीची ( Jayant Patil on Central Election Commission ) मतदान प्रक्रिया संपून जवळपास नऊ तासांचा अवधी उलटून गेल्यानंतर ( Jayant Patil on rajya sabha voting ) केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आमदार सुभाष खांदे यांचे मत बाद ठरवले. या निर्णयाबाबत ( Jayant Patil on rajya sabha election result ) महाविकास आघाडी समाधानी नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी दिली.

Jayant Patil on rajya sabha election
मंत्री जयंत पाटील

By

Published : Jun 11, 2022, 6:30 AM IST

Updated : Jun 11, 2022, 6:59 AM IST

मुंबई - राज्यसभा निवडणुकीची ( Jayant Patil on Central Election Commission ) मतदान प्रक्रिया संपून जवळपास नऊ तासांचा अवधी उलटून गेल्यानंतर ( Jayant Patil on rajya sabha voting ) केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आमदार सुभाष खांदे यांचे मत बाद ठरवले. या निर्णयाबाबत ( Jayant Patil on rajya sabha election result ) महाविकास आघाडी समाधानी नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना मंत्री जयंत पाटील

हेही वाचा -न्या. एस.एस.शिंदे, मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने दोन दिवसात केली 190 प्रकरणांवर सुनावणी

राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया दुपारी चार वाजता संपली. संध्याकाळी पाच नंतर मतमोजणीला सुरुवात होणे अपेक्षित होते. भाजप आणि महाविकास आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एकमेकांविरोधात तक्रार केल्याने मतमोजणीची प्रक्रिया रखडली. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची तब्बल तीन तास बैठक झाली. या बैठकीनंतर मतदान केंद्रावरील व्हिडिओ आणि मतदान प्रक्रिया तपासण्यात आली. सुमारे नऊ तासांहून अधिक कालावधीनंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यावर हरकत घेतली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, सुभाष कांदे यांचे मत वैध आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एका आधारे निकाल दिला आहे. या निकालावर आम्ही समाधानी नाही. सर्व प्रक्रिया पाहून आघाडी सरकार पुढील निर्णय घेईल, असे पाटील यांनी सांगितले. तसेच, केवळ एक ते दीड तासाच्या मतमोजणीचा कालावधी ज्याप्रकारे वाढवला गेला, हे सूडाच्या राजकारणाचा प्रकार असल्याचेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा -Rajya Sabha Election Results : भाजपानंतर महाविकास आघाडीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार

Last Updated : Jun 11, 2022, 6:59 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details