मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Shirala Court warrant to Raj Thackeray) यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2008 मधील सांगलीतील एका प्रकरणाबाबत राज ठाकरे न्यायालयात हजर (Raj Thackeray in Shirala Court) राहत नसल्याने त्यांच्या विरोधात शिराळा न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. राज ठाकरे यांना 8 जूनपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिराळा न्यायालयाकडून आता हे वॉरंट मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहे. राज ठाकरे न्यायालयात हजर राहिल्यास त्यांचे वॉरंट रद्द करण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांनी दिली आहे.
हेही वाचा -Raj Thackeray : एक घाव दोन तुकडे करणाऱ्या राज ठाकरेंचा मात्र पुन्हा यूटर्न?
काय आहे प्रकरण - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात एका जुन्या प्रकरणात सांगलीच्या शिराळा न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेमुळे कल्याणमध्ये २००८ रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये राज ठाकरेंवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. परंतु या अटकेनंतर महाराष्ट्रात मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. यामध्ये परळी आणि सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सांगलीतील शिराळा न्यायालयाकडून राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. जामीन मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी न्यायालयात हजेरी लावली नाही. सतत गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई करण्यात येत आहे.