महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Andheri East Assembly By Election : अंधेरी पोटनिवडणुकीच्या जागेसाठी 'हे' १४ उमेदवार रिंगणात

महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व (Andheri East Assembly By Election) या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली (Nominations of Latke Patel and 12 other candidate) आहे.

Andheri East Assembly By Election
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक

By

Published : Oct 16, 2022, 8:53 AM IST

Updated : Oct 16, 2022, 3:42 PM IST

मुंबई :संपूर्ण राज्यभराचं लक्ष असलेलेअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली (Andheri East Assembly By Election) आहे. दोन्हीही पक्षाकडून आपले ताकदीचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत.

१४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने मुर्जी पटेल यांना उमेदवारी दिली (Nominations of Latke Patel and 12 other candidate) आहे. मात्र या दोन पक्षाच्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर १२ उमेदवार देखील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत आपलं नशीब आपलं नशीब आजमावत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली (candidates for Andheri East Assembly By Election) आहे.

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे :

उमेदवार पक्ष
ऋतुजा रमेश लटके शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे
मुरजी कानजी पटेल भारतीय जनता पार्टी
राकेश अरोरा हिंदुस्थान जनता पार्टी
बाला व्यंकटेश विनायक नाडार आपकी अपनी पार्टी - पीपल्स
मनोज श्रावण नायक राईट टू रिकॉल पार्टी
चंदन चतुर्वेदी अपक्ष
चंद्रकांत रंभाजी मोटे अपक्ष
निकोलस अल्मेडा अपक्ष
नीना खेडेकर अपक्ष
पहल सिंग धन सिंग आऊजी अपक्ष
फरहाना सिराज सय्यद अपक्ष
मिलिंद कांबळे अपक्ष
राजेश त्रिपाठी अपक्ष
शकिब जाफर ईमाम मलिक अपक्ष

नामनिर्देशन पत्र छाननीनंतर वैद्य -14 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र छाननीनंतर वैद्य ठरविण्यात आले (Nomination of 14 candidates) आहेत. 17 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. पोट निवडणुकीला मतदान करता यावे, यासाठी राज्य सरकारकडून या विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग करून मतदान करावे, असे आवाहन उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Last Updated : Oct 16, 2022, 3:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details