मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मंडळाने यावर्षी गणेशोत्सवाऐवजी आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे.
'गणेशोत्सव नव्हे तर यंदा आरोग्य उत्सव'; लालबागचा राजा मंडळाचा ऐतिहासिक निर्णय - लालबागचा राजा
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी लालबागच्या राजाचा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत भाविकांसाठी 'आरोग्य उत्सव' साजरा करण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा...राज्य सरकारचा 'मराठी बाणा' ...मराठीत कामकाज केले नाही तर शासकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे. या निर्णयाने राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे.' असे ट्विट करण्यात आले आहे.