मुंबई -कोणत्याही पक्षाने कोणत्याही नेत्याच्या घरावर आंदोलन करणे योग्य नाही. अशा आंदोलनांमध्ये एकमेकांच्या पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यास हाणामारी होण्याची शक्यता असते. (Nawab Malik On Agitation) त्यामुळे अशा आंदोलनाचा पायंडा महाराष्ट्रात पडू नये असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याच्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. मुंबईकर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली
महाराष्ट्रातून गेलेल्या मजुरांमुळेच देशभर करोना पसरला असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केल होत. या वक्तव्यावरून पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन सुरू असून आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरा बाहेर काँग्रेसने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ही काँग्रेसला आक्रमक आंदोलन करु उत्तर दिले. मात्र काँग्रेसने केलेल्या या आंदोलनावर नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारचे आंदोलन केल्यामुळे प्रशासन आणि पोलिसांवरचा ताण वाढतो. त्यामुळे सर्वच पक्षाने याबाबत संयम राखला पाहिजे. तसेच आंदोलनासाठी दिलेल्या जागेवर आंदोलन केली पाहिजेत असा सल्लाही नवाब मलिक यांच्या कडून घेण्यात आला आहे.