महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitin Raut to High Court : 'खासगी कामासाठी नव्हे, शासकीय कामासाठीच लॉकडाऊनमध्ये केला चार्टर्ड प्लेनचा वापर' - chartered planes used for official government work

राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळामध्ये वैयक्तिक कामासाठी चार्ट प्लॅनचा वापर केला (chartered planes used for official government work) होता. या प्रवासामध्ये राज्य वीज कंपन्यांचे 40 लाख रुपये बेकायदेशीररित्या वापरल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील आज सुनावणीदरम्यान नितीन राऊत यांनी असे सांगितले की, कोणत्याही वैयक्तिक कामासाठी नाही, तर अधिकृत शासकीय कामासाठी चार्टर्ड विमानांचा वापर केला (Nitin Raut said to High Court) होता.

former Minister Nitin Raut
माजी मंत्री नितीन राऊत

By

Published : Sep 20, 2022, 10:48 AM IST

मुंबई -राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळामध्ये वैयक्तिक कामासाठी चार्ट प्लॅनचा वापर केला (chartered planes used for official government work) होता. या प्रवासामध्ये राज्य वीज कंपन्यांचे 40 लाख रुपये बेकायदेशीररित्या वापरल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील आज सुनावणीदरम्यान नितीन राऊत यांनी असे सांगितले की, कोणत्याही वैयक्तिक कामासाठी नाही, तर अधिकृत शासकीय कामासाठी चार्टर्ड विमानांचा वापर केला (Nitin Raut said to High Court) होता.

वीज निर्मिती व वितरण कंपन्यांकडून माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार, टाळेबंदीच्या कालावधीत राऊत यांनी चार्टर्ड विमानातून प्रवास केला. तसेच प्रशासकीय कामाचे कारण देत वीज कंपन्यांना बिल भरण्यास भाग पाडले, असा आरोप पाठक यांनी या याचिकेतून केला आहे. नितीन राऊत यांनी टाळेबंदीच्या काळात मुंबई, नागपूर, हैदराबाद आणि दिल्ली दरम्यान अनेकदा चार्टर्ड विमानातून प्रवास केला. यासाठी कर्जबाजारी असलेल्या वीज कंपन्यांना 40 लाख रुपयांचे बिल भरण्यास भाग पाडल्याचं त्यांनी म्हटले आहे.


सार्वजनिक पैशाचा वैयक्तिक कारणांसाठी वापर -वीज कंपन्यांनी खर्च केलेला पैसा, हा सार्वजनिक पैसा असून त्याचा मंत्र्यांनी वैयक्तिक कारणांसाठी वापर केल्याचा आरोप करत ऊर्जा मंत्र्यांच्या दबावाखाली राज्य वीज कंपन्यांनी या प्रवासासाठी पैसे दिल्याचाही आरोप याचिकेतून केलेला आहे. त्यामुळे मंत्र्यांकडून प्रवासासाठी झालेल्या खर्चाची भरपाई वसूल करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावे, अशी मागणी पाठक यांनी केली (Nitin Raut used chartered planes) आहे.



सदर याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. राऊत यांनी नागपूरला प्रवास करण्यासाठी 12 वेळा चार्टर्ड विमानातून प्रवास केला. त्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून कऱण्यात आला. त्यावर राऊत यांच्यावतीने प्रतिज्ञापत्रातून उत्तर देण्यात आले. त्यानुसार आपण चार्टर्ड विमानासाठी केलेला खर्च हा बेकायदेशीर मनमानी आणि सार्वजनिक निधीचा अपव्यय करणारा होता. हा याचिकाकर्त्यांना आरोप चुकीचा असल्याचे सांगत त्यांचा दावा राऊत यांनी तो फेटाळून (chartered planes used for official government work) लावला.


टाळेबंदीत प्रशासकीय कामांसाठी राऊतांचा चार्टर्ड विमानातून प्रवास -नागपूरचे पालकमंत्री या नात्याने आपल्याला प्रशासकीय कामासाठी पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यात नियमितपणे जावे लागत होते. त्यामुळे आपण प्रशासकीय कामासाठी नागपूरला गेलो (government work in lockdown) होतो. ज्यात दैनंदिन कामकाजाची देखरेख वीज कंपन्यांची दैनंदिन कामे आणि कोविड-19 काळातील परिस्थिती आणि निसर्ग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करणे इत्यांदीचा समावेश होता. असा खुलासाही राऊत यांनी प्रतिज्ञापत्रातून केला. सामान्यतः रेल्वे आणि व्यावसायिक विमानाने आपण नागपूरला जातो, मात्र टाळेबंदीमुळे चार्टर्ड विमानाने प्रवास करावा लागला असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. त्याची दखल घेत न्यायालयाने याचिकेची सुनावणी 10 ऑक्टोबर रोजी निश्चित केली.

ABOUT THE AUTHOR

...view details