महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुण्यातील आकडेवारीत?; नितेश राणेंचे ट्विट

राणे यांनी मंगळवारी ट्विट करुन यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच 'मुंबई पॅटर्न' आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच अनेक लोकांनी मला याबद्दल माहिती दिली असल्याचे म्हणाले. मुंबईत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की त्याला पुण्याच्या कोविड वॉररूममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत असल्याचे नितेश यांनी म्हटले.

आमदार नितेश राणे
आमदार नितेश राणे

By

Published : May 11, 2021, 3:55 PM IST

मुंबई- राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा मुंबई पॅटर्न हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ठाकरे सरकार मुंबईतील रुग्णांची नोंद पुण्याच्या खात्यात करून येथील आकडा कमी भासवत असल्याचे नितेश राणे यांनी ट्विट केले आहे.

नितेश राणेंचे ट्विट

राणे यांनी मंगळवारी ट्विट करुन यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच 'मुंबई पॅटर्न' आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच अनेक लोकांनी मला याबद्दल माहिती दिली असल्याचे म्हणाले. मुंबईत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की त्याला पुण्याच्या कोविड वॉररूममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत असल्याचे नितेश यांनी म्हटले.

https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum11-bjpmlaniteshraneonbmc-7209793_11052021122317_1105f_1620715997_512.jpg

राणे म्हणाले की, "कोरोना रुग्ण मुंबईतून पुण्यात ट्रान्सफर केले जातात म्हणजे त्यांना प्रत्यक्षात एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवले जात नाही. तर केवळ त्यांची नोंद इतर शहरांच्या कोरोना आकडेवारीत केली जाते. त्यामुळे इतर शहरांतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा मुंबईच्या तुलनेत जास्त राहतो". राणे यांच्या आरोपाला महाविकास आघाडीचे नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details