महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सचिन वाझेची बाईक घेतली ताब्यात; एनआयएची कारवाई

अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटकेत असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेची बाईक ताब्यात घेतली आहे. यापूर्वी 'एनआयए'ने आठ गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यातून महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागल्याची माहिती आहे. रविवारी रात्री ताब्यात घेतलेल्या वाझेच्या बाईकचा या प्रकरणाशी काय संबंध आहे, हेही लवकरच समोर येईल.

NIA seizes Sachin Waze's bike
सचिन वाझेची बाईक एनआयएच्या ताब्यात

By

Published : Apr 5, 2021, 9:01 AM IST

Updated : Apr 5, 2021, 1:44 PM IST

मुंबई - अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटकेत असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेची बाईक ताब्यात घेतली आहे. यापूर्वी 'एनआयए'ने आठ गाड्या जप्त केल्या आहेत. त्यातून महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागल्याची माहिती आहे. रविवारी रात्री ताब्यात घेतलेल्या वाझेच्या बाईकचा या प्रकरणाशी काय संबंध आहे, हेही लवकरच समोर येईल.

बाईसोबत आणखी सामान एनआयएच्या ताब्यात..

सकाळी NIA कार्यालयात एका टेम्पोमधून काही सामान आणण्यात आले होते. या टेम्पोमध्ये एक बाईक होती. ही बाईक मीना जॉर्ज नावाच्या महिलेच्या नावावर आहे. बाईकचे नाव बेनेली असून तिची किंमत साडेसात लाख रुपये आहे. बाईकसोबत आणखी काही साहित्य एनआयएने ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा -कोरोना अपडेट : गेल्या २४ तासांमध्ये देशात १ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; ४७८ बळी

बाईकव्यतरिक्त वाझेंच्या ८ अलिशान गाड्याही एनआयएच्या ताब्यात

या बाईकव्यतरिक्त एनआयएने सचिन वाझेंच्या आठ अलिशान गाड्याही ताब्यात घेतल्या आहेत. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आणि अँटिलिया कार स्फोटक प्रकरणात अनेक आलिशान गाड्या वापरण्यात आल्या होत्या. एनआयएने आतापर्यंत आठ गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. या गाड्यांची यादी अजून वाढणार असल्याची शक्यता आहे. नेमक्या या गाड्या आहेत तरी कोणत्या पाहुयात...

  • गाडी क्रमांक 1 स्कॉर्पिओ

25 फेब्रुवारी रोजी एक स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या घराबाहेर सापडली आणि खळबळ उडाली. गाडी सुरुवातीला एटीएसने ताब्यात घेतली. मात्र, तपासात या गाडीचा नंबर प्लेट बनावट असल्याचे समोर आले. मात्र गाडीच्या काचेवर एक नंबर लिहिला होता आणि त्यावरून ती गाडी डॉक्टर सॅम न्यूटन यांची असल्याचे समोर आले .गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता गाडीच्या मालकाने काही आर्थिक व्यवहारात ही गाडी मनसुख हिरेन नावाच्या व्यक्तीला दिली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथे सापडला. मनसुख हिरेन यांचा खून सचिन वाझे याने केला असावा अशी तक्रार मनसुख हिरेन यांच्या पत्नी यांनी दिली. तसेच प्रकरणात वापरलेली स्कॉर्पिओ हे सचिन वाझे चालवत होते अशीही माहिती हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना दिली. मात्र, एटीएसच्या तपासात वाझेने मी स्कॉर्पिओ वापरली नाही असे सांगितले होते.

  • गाडी क्रमांक 2 इनोव्हा -

या सगळ्या प्रकरणात एक सीसीटीव्ही समोर आला. त्यात मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीच्या मागे एक इनोव्हा उभी होती आणि ही इनोव्हा सीआययुच्या पथकातली असल्याचा संशय होता. तपासाची चक्रे फिरली आणि मुंबई पोलीस आयुक्तालयातून एक सफेद रंगाची इनोव्हा गाडी ताब्यात घेण्यात आली. या गाडीचा तपास यंत्रणेमार्फत तपासणीही केली. काही नमुने फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले. घटनेच्या दिवशी याच गाडीतून वाझेने पांढरा कुर्ता घालून प्रवास केला होता.

  • गाडी नंबर 3 मर्सिडीज

या संपूर्ण वाझे पुराणात एक महागडी मर्सिडीज कारसमोर येत आहे. सीएसटी स्थानक परिसरातून 16 मार्च रोजी ही गाडी ताब्यात घेतली जाते. एनआयए या गाडीची कसून तपासणी करते, त्यावेळेस या ब्लॅक रंगाच्या मर्सिडीज कारमधून एक पैसे मोजण्याचे मशीन, पाच लाखापेक्षा जास्त रोख रक्कम, नंबर प्लेट आणि काही कपडे जप्त केले जातात. अशी माहिती एनआयएचे आयजी अनिल शुक्ला यांनी दिली होती. सध्या ही गाडी एनआयए कॅम्पसमध्ये आहे.

  • गाडी क्रमांक 4 प्राडो

या संपूर्ण प्रकरणात तिसरी गाडी समोर आली ती गाडी म्हणजे प्राडो. ही तीच गाडी आहे ज्या गाडीतून मनसुख हिरेन आणि सचिन वाझे हे दोघेही पोलीस आयुक्त कार्यालयात आले होते. या प्रकरणात हिरेन स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी सचिन वाझेसोबत सीपी ऑफिसला आले होते. सध्या ही गाडी एनआयएच्या ताब्यात आहे. या गाडीचे देखील नमुने फॉरेन्सिक विभागाकडे पाठवले आहेत.

  • गाडी नंबर 5 मर्सिडीज (2)

या सगळ्या प्रकरणामध्ये गाड्यांची लांबलचक यादीच आहे. यात अजून एक गाडीची एंट्री होते ती म्हणजे मर्सिडीज (2). वाझे आणि मनसुख हिरेन हे 17 फेब्रुवारी रोजी सीएसएमटी परिसरात याच गाडीत बसले होते. मनसुख हिरेन यांनी याच गाडीत वाझे याला स्कॉर्पिओ गाडीची चावी दिली होती, असे बोलले जातं आहे. ही गाडी देखील आता एनआयएच्या ताब्यात आहे.

  • गाडी नंबर 6 आउटलेंडर

या प्रकरणात आऊटलेंडर ही गाडी अनेक दिवसांपासून तपास यंत्रणांच्या रडारवर होती. अखेर या गाडीचा शोध नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 7 येथे लागला आहे. सुमारे एक महिना ही गाडी या परिसरात एका सोसायटीच्या बाहेर उभी होती. ही गाडी वाझेच्या नावावर असून, गाडी सीआययु पथकातील प्रकाश ओव्हाळ वापरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रकाश ओव्हाळ याची अनेक दिवसांपासून एनआयएकडून चौकशी सुरू आहे. सध्या ही गाडी एनआयएच्या ताब्यात आहे. तसेच प्रकाश ओव्हाळ याची चौकशी सुरू आहे.

  • गाडी क्रमांक 7 व्होल्वो -

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास आधी एटीएस करत होती. हा तपास महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातपर्यंत गेला होता. या तपासदरम्यान एटीएसने नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोघांना अटक केली. या प्रकरणात एक व्होल्वो गाडी दमन येथून ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतर करण्यात आला आहे. ही गाडी आता एनआयएने ताब्यात घेतली असून, याचा तपास सुरू आहे.

  • गाडी क्रमांक 8 मर्सिडीज

एनआयएने आठवी गाडी ताब्यात घेतली आहे. सफेद रंगाची ही मर्सिडीज गाडी आहे. ही गाडी सचिन वाझे चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अँटिलिया आणि सचिन वाझे प्रकरणात मर्सिडीज गाडीची महत्वाची भूमिका आहे. मागील अनेक दिवसांपासून या गाडीचा एनआयए शोध घेत होती.

हेही वाचा -पुण्यातील ससूनच्या डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा, जास्त वर्कलोड असल्याची तक्रार

Last Updated : Apr 5, 2021, 1:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details