मुंबई -एनआयए मागील अनेक दिवसांपासून ज्या ऑडी कारचा शोध घेत होती तिची ओळख पटली आहे. या कारमध्येच विनायक शिंदे आणि सचिन वाझे दिसत आहेत. एका टोलनाक्यावरील हा सीसीटीवी फुटेज असून ही कार सध्या वसईत असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार एनआयएची एक टीम वसई आणि आसपासच्या परिसरात या गाडीचा शोध घेत आहे. ईटीव्ही भारतच्या हाती सीसीटीव्ही फुटेजचा फोटो लागला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विनायक शिंदे आणि सचिन वाझे दिसत आहेत. मात्र, हा सीसीटीव्ही अस्पष्ट आहे. सध्या एनआयए अनेक टोल नाक्यावरचे फुटेज खंगाळत असून ठोस पुरावे गोळा करण्यासाठी युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
NIA कडून त्या 'ऑडी' कारचा शोध सुरू - sachin vaze mumbai
एनआयए मागील अनेक दिवसांपासून ज्या ऑडी कारचा शोध घेत होती तिची ओळख पटली आहे. या कारमध्येच विनायक शिंदे आणि सचिन वाझे दिसत आहेत. एका टोलनाक्यावरील हा सीसीटीवी फुटेज असून ही कार सध्या वसईत असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणात आतापर्यंत हस्तगत केलेल्या गाड्या -
24 आणि 25 फेब्रुवारीच्या रात्री मुंबईतल्या प्रियदर्शनी पार्क जंक्शनजवळ एक स्कॉर्पिओ थांबली होती. मध्यरात्री पावणे दोन वाजता त्याच ठिकाणी एक पांढरी इनोव्हा आली आणि या दोन्ही गाड्या पुढे मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या दिशेने गेल्या. स्कॉर्पिओ अंबानी यांच्या घराबाहेर पार्क करण्यात आली. तर बरोबरची पांढरी इनोव्हा मुलुंड टोलनाका पार करून ठाण्याच्या दिशेने गेली आणि नंतर गायब झाली. वाझेंच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशीच सरकारी इनोव्हा कार जप्त करण्यात आली होती. या गाडीचा नंबर एमएच 01 झेडए 403 असा आहे. 17 मार्चला एक मर्सिडीज जप्त करण्यात आली. या गाडीचा नंबर एमएच 18 बीआर 9095 असा आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने यानंतर सचिन वाझे यांच्या ठाण्यातील साकेत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीत छापा टाकला. यावेळी चौकशीदरम्यान, पार्किंग लॉटमध्ये उभ्या करण्यात आलेली प्राडो ही आलिशान गाडी जप्त करण्यात आलेली आहे. या गाडीचा नंबर एमएच 02 सीओ 101 असा आहे. नवी मुंबईत असलेल्या नर्मदा ऑफ शोर कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीच्या नावावर असलेली मर्सिडीज गाडी राष्ट्रीय तपास यंत्रणेने जप्त केली आहे. या गाडीचा रजिस्टर क्रमांक हा नवी मुंबई आरटीओमधील असल्याचे समोर आले आहे. या गाडीचा नंबर एमएच 43 एआर 8697 असा आहे. आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणांनी पाच गाड्या जप्त केल्या आहेत. या सर्व गाड्या सचिन वाझे वापरत असल्याचे समोर आले आहे.