महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

NIA Raids In Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित 29 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी; तिघेजण ताब्यात

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ( Dawood Ibrahim ) संबंधित व्यक्तींविरोधात आज ( 9 मे ) मुंबईत विविध 29 ठिकाणी एनआयएने छापेमारी केली ( NIA Raids At 29 Places In Mumbai ) आहे. याछापेमारीत तीन जणांना अटक करण्यात आली ( NIA Three Arrested Linked To Dawood Ibrahim ) आहे.

Dawood Ibrahim
Dawood Ibrahim

By

Published : May 9, 2022, 4:54 PM IST

Updated : May 9, 2022, 9:48 PM IST

मुंबई -अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ( Dawood Ibrahim ) संबंधित व्यक्तींविरोधात आज ( 9 मे ) मुंबईत विविध 29 ठिकाणी एनआयएने छापेमारी केली ( NIA Raids At 20 Places In Mumbai ) आहे. या छापेमारीत दाऊद इब्राहिमचे साथीदार छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची, दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि नातेवाईकांचा समावेश आहे. आज केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत यांना एनआयएने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये छोटा शकीलचे नातेवाईक सलीम फ्रूट, माहीम आणि हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सुहैल खंडवानी, अब्हुल कयूम यांना येणे ताब्यात घेतले ( NIA Three Arrested Linked To Dawood Ibrahim ) आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रकरणाशी संबंधित प्रकरणाची चौकशी एनआयए कडून सुरू आहे.

एनआयएने आज बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, भेंडी बाजार, गोरेगाव, परळ, मुंब्रा आणि कोल्हापूर येथील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबईतील काही तस्कर, हवाला ऑपरेटर, रिअल इस्टेट व्यापारी यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. या सर्वांचे कनेक्शन 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि फरारी दहशतवादी दाऊद इब्राहिमशी असल्याचे सांगितले जात आहे.

सलीम फ्रुटला अटक - एनआयएने दाऊद गँगशी संबंधित छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूट यालाही अटक केली आहे. सलीम याच्या घरी आणि इतर ठिकाणीही छापेमारी करण्यात आली असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. कोणत्यातरी मोठ्या नेत्यावर हल्ला होण्याचा कट शिजत होता, असा एनआयएला संशय आहे. ही कारवाई गोपनीय ठेवण्यात आली होती. त्यामुळे या छापेमारीशी संबंधित फोटो किंवा व्हिडिओ अद्याप मिळालेले नाहीत.

हाजी अली दर्गाचे ट्रस्टी अटकेत - या छापेमारीत मोठी कारवाई करत एनआयएने माहिम आणि हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सुहैल खंडवानी यांना अटक केली आहे. सुहैल खंडवानी हे टचवुड रिएल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक हेही 2006 ते 2016 या कालावधीत या फर्मचे संचालक होते. या कंपनीत फराज यांच्यासह फारुक आणि जकारिया दरवेश हेही भागीदार आहेत. एनआयए यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. 150 कोटींच्या बँकेतील अफरातफरी प्रकरणात सीबीआयकडून याफर्मची चौकशी सुरु आहे.

दाऊद पुन्हा सक्रीय? -दहशतवादाला होत असलेल्या फंडिंगचा उपयोग करत पुन्हा एकदा दाऊद मुंबईत अंडरवर्ल्डचे नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न करीत होता. राजकीय नेते, व्यापारी आणि इतर मान्यवर व्यक्तींवर हल्ले करुन मुंबईसह इतर शहरांतही दहशत पसरवण्याचा त्याचा कट होता. यासाठी त्याने एका विशेष गँगचीही स्थापना केली होती. त्यामुळेच या प्रकरणी एनआयएने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येतं आहे.

कारवाईमागे नवाब मलिक कनेक्शन - कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध अटक केलेल्या प्रकरणातच ही छापेमारी करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांना मनीलाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. दाऊद इब्राहिमच्या फ्रंटमॅनसोबत मलिकांनी व्यवहार केल्याचा आरोपानंतर ईडीने ही कारवाई केली होती. त्यानंतर दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास केंद्रिय गृह मंत्रालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये एनआयएकडे सोपवला होता. केंद्रिय गृह मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे डी-कंपनी आणि दाऊद इब्राहीम भारतात टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्ज स्मगलिंग आणि बनावट चलनाचा वापर करण्याचे काम करत आहे.

त्याचसोबत दाऊद इब्राहिम आणि डी-कंपनी लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदा यांच्या माध्यमातून भारतात अतिरेकी कायवाया करत असल्याचेही गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे. एनआयए फक्त दाऊद इब्राहिम आणि डी-कंपनीचीच चौकशी करणार नाही आहे. तर, छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इकबाल मिर्ची, दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित घटनांचाही तपास करणार आहे.

या ठिकाणी एनआयएची छापेमारी -


1. बांद्रा
-समीर हिंगोरा यांचं घर

2. ओशिवरा
- प्लूटो इमारत,ओशिवरा इंडस्ट्रीयल इस्टेट इथे टीम दाखल
- अतिफ शेख आणि तबससुम शेख
- सुरेश शेट्टी ऋषिकेश इमारत,लोखंडवाला कॉम्प्लेक्स


3. गोरेगाव
- अजय गोंसलीया यांच्या घरी


4. अंटोप हिल
- 8 मन्नत हावरा, बंगाली पूरा


5. अंबोली
- मूनाफ मोहम्मद युसुफ शेख
- लिली अपार्टमेंट, बिल्डिंग नं 4,फ्लॅट क्रं 707,एस व्ही रोड

हेही वाचा -Bomb Blast Case : हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सुहैल खंडवानीं एनआयएच्या ताब्यात, 1993 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी चौकशी

Last Updated : May 9, 2022, 9:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details