महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Umesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे हत्याकांड; एनआयएने अमरावतीतून आणखी दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या - एनआयएने आवळल्या आरोपींच्या मुसक्या

अमरावतीतील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांनी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्या पोस्टचे स्क्रिनशॉट्स डॉ. युसूफ खानने शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर उमेश कोल्हे यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला करत ठार केले. याप्रकरणी एनआयएने अगोदर 7 आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर आता आणखी दोन आरोपीला एनआयएने अमरावतीतून जेरबंद केले आहे.

Umesh Kolhe Murder Case
उमेश कोल्हे हत्याकांड

By

Published : Aug 3, 2022, 4:13 PM IST

मुंबई -नुपूर शर्मा यांना समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याने अमरावतीतील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींना एनआयएने अमरावतीमधून ताब्यात घेतले आहे. मुशिद अहमद अब्दुल रशीद (41) आणि अब्दुल अरबाज अब्दुल सलीम (23) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. यापूर्वी 7 आरोपींना एनआएने अटक केली आहे. सध्या हे सातही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.

एनआयएने मंगळवारी आवळल्या आरोपींच्या मुसक्या -एनआयएने मुशिद अहमद अब्दुल रशीद आणि अब्दुल अरबाज अब्दुल सलीम या दोघांना मंगळवारी अमरावतीतून ताब्यात घेतले आहे. या आरोपींना मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात आणण्यात येणार आहे. यापूर्वी देखील अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले होते.

एका फरार आरोपीचाही समावेश -उमेश कोल्हे हत्याकांडाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएकडे दिल्यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विषय एनआयए न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना दोन वेळा एनआयए कोठडी देण्यात आली होती. त्यापैकी एक आरोपी फरार असल्याचे देखील सांगण्यात आले होते. त्यापैकी मंगळवारी अटक करण्यात आलेल्या आरोपीत त्याचा सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एनआयएने मागितली आरोपींची कोठडी -एनआयएने न्यायालयामध्ये म्हटले होते, की या आरोपींच्या दहशतवादी संघटनेची संबंध असल्याचे अनेक पुरावे तपासा दरम्यान सापडले आहेत. सध्या आरोपींचा कोणत्या दहशतवादी संघटनेची संबंध आहे, यासंदर्भात खुलासा करता येणार नाही. मात्र या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो. यासाठी या आरोपींना एनआयए कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या सर्व आरोपींविरोधात दहशतवादी संघटनेच्या संबंधित युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

'या' आरोपींच्या आवळल्या होत्या मुसक्या -एनआयएकडून यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इरफान खान, मुदस्सर अहमद उर्फ सोनू राजा शेख इब्राहिम, शाहरुख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान, अब्दुल तौफिक उर्फ नाना शेख तस्लीम उर्फ भैय्या साबीर खान, अतीब रशीद आदिल रशीद, युसूफ खान बहादुर खान या आरोपींचा समावेश होता.

काय आहे उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण -उमेश कोल्हे हे अमरावती तहसील परिसरात पशूंच्या औषध विक्रीचे दुकान चालवत होते. डॉक्टर युसुफ खान हा त्यांच्याकडून नियमित औषधे खरेदी करायचा. उमेश कोल्हे यांच्यासोबत त्याची बऱ्यापैकी ओळख झाल्यामुळे कोल्हे यांनी त्याला अनेकदा आर्थिक मदत केल्याचीही माहिती समोर आली असून, त्याच्याकडे उधारीची बरीच मोठी रक्कम थकीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. असे असताना आपल्या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. डॉक्टर युसूफ खानने उमेश कोल्हे यांनी शेअर केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून इतर ठिकाणी त्या शेअर केल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details