मुंबई - बुली बाई ॲप प्रकरणात ( Bulli Bai App Case ) मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाने ( Mumbai Cyber Police ) आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे ( CP Hemant Nagrale ) यांनी काल दिली आहे. मात्र आता या प्रकरणात आणखी वेगळे वळण लागले असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचे नेपाळ कनेक्शन ( Bully Bai App Nepal Connection ) असल्याचे समोर आले आहे. मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करणाऱ्या एका ट्विटर युजरने ( Twitter user claims He Is Creator ) राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील ( State Home Minister Satej Patil ) यांच्या ट्विटला रिट्विट करत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर, अटक करण्यात आलेले आरोपी निर्दोष असल्याचे देखील या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.
मुंबई पोलीस जाणार नेपाळला
मुंबई पोलीस सायबर सेलकडून बेंगलोरमधून विशाल कुमार झा ( Vishal Kumar Zha ) , तर उर्वरित दोन आरोपी श्वेता सिंग ( Accuse Shweta Singh ) , मयंक रावल ( Accuse Mayank Rawal ) उत्तराखंड मधून अटक केली आहे. उत्तराखंडमधील आरोपींना मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच त्यांना मुंबईत घेऊन येणार आहे. तसेच आता नेपाळमधील मुख्य सूत्रधार याला देखील मुंबई पोलीस ताब्यात घेण्याची तयारी करत आहेत. त्याकरता मुंबई पोलिस लवकरच नेपाळला रवाना होणार असल्याची अशी माहिती मुंबई पोलीस दलातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.