महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

2021 मध्ये मुंबईकरांचा प्रवास होणार 'सुसाट' आणि 'सुकर'! 'हे' प्रकल्प सेवेत दाखल - Metro Car shed

राज्य सरकारने पुढील 30 ते 100 वर्षांचा विचार करत विविध वाहतूक सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. मेट्रो, महामार्ग, उन्नत रोड, उड्डाणपूल अशा अनेक प्रकल्पाचा यात समावेश असून या प्रकल्पाची कामे वेगात सुरू आहेत. तर महत्वाचे म्हणजे यातील काही प्रकल्प नव्या वर्षांत म्हणजेच 2021मध्ये पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणार आहेत.

मुंबई
मुंबई

By

Published : Dec 31, 2020, 10:37 AM IST

मुंबई -मुंबईत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न मागील काही वर्षांपासून गंभीर बनला आहे. तर भविष्यात मुंबईतील लोकसंख्या आणखी वाढत जाणार असून वाहतूक सुविधा, रस्ते, उड्डाणपूल अपुरे पडणार आहेत. हीच बाब लक्षात राज्य सरकारने पुढील 30 ते 100 वर्षांचा विचार करत विविध वाहतूक सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. मेट्रो, महामार्ग, उन्नत रोड, उड्डाणपूल अशा अनेक प्रकल्पाचा यात समावेश असून या प्रकल्पाची कामे वेगात सुरू आहेत. तर महत्वाचे म्हणजे यातील काही प्रकल्प नव्या वर्षांत म्हणजेच 2021मध्ये पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणार आहेत. मेट्रो 2 अ, मेट्रो 7 पासून अगदी हँकॉक ब्रिजपर्यंत अनेक प्रकल्प सुरू होणार आहेत. यामुळे मुंबईकरांचा प्रवास बऱ्यापैकी सुकर आणि सुसाट होणार आहे.

नव्या वर्षात नवे पूल नागरिकांच्या सेवेत

मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 प्रवास होणार सुरू -

मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. 350 किमी हून अधिक मेट्रोचे जाळे विणले जाणार आहे. याच मेट्रो प्रकल्पात मेट्रो 2 अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो 7(दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) या मार्गाचा समावेश आहे. या दोन्ही मार्गाचे काम वेगात सुरू आहे. हे प्रकल्प खरे तर आता डिसेंबर 2020मध्ये पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनामुळे काम रखडले आणि कामाची डेडलाइन डिसेंबर 2020 वरून आत मे 2021 वर गेली आहे. पण कॊरोनाचा इफेक्टस अजूनही संपलेला नाही. या दोन्ही प्रकल्पाची कामे विलंबाने होत आहेत. त्यामुळेच 14 जानेवारीला होणारी या दोन्ही मार्गाची ट्रायल रन आता मार्च मध्ये होणार आहे. तेव्हा मे 2021 ची डेडलाइन काही पुढे जाण्याची शक्यता आहे. पण तरीही या वर्षांतच हे प्रकल्प पूर्ण करत ते वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग सुरू झाले तर पश्चिम उपनगरातील नागरिकांसाठी हे आजवरचे सर्वात मोठे गिफ्ट असणार आहे. कारण आजच्या घडीला दहिसर वरून अंधेरी वा डी एन नगर ला जायचे असेल तर एक ते दीड तास लागतात. मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पण हे मेट्रो मार्ग सुरू झाल्यास हा प्रवास काही मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. लोकलच्या गर्दीतून सुटका होऊन गारेगार प्रवास करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे सद्या मेट्रो1 (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) सेवेत आहे. पण या दोन्ही मेट्रो ट्रॅकवर असल्यास तीन मेट्रो मार्ग मुंबईत कार्यान्वित होतील हे विशेष.

वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका

बीकेसीचा प्रवास होणार सुपरफास्ट -

जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून वांद्रे-कुर्ला संकुला (बीकेसी)चा विकास एमएमआरडीएकडून करण्यात येत आहे. यायच भाग म्हणून बीकेसीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासह विविध भागातून बिकेसीत सुपरफास्ट येता यावे यासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील एक प्रकल्प म्हणजे बीकेसी कनेक्टर. सी लिंकवरून बीकेसीला आणि बीकेसी वरून सी-लिंकला जाण्यासाठी दोन उन्नत रोड तसेच बीकेसी ते धारावी उन्नत रोड असे तीन कनेक्टर बांधण्यात येत आहेत. हे तिन्ही कनेक्टर 2021 मध्ये पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणार आहेत. हे तिन्ही मार्ग सुरू झाल्यास सिग्नल विरहित थेट बीकेसीत पोहचता येणार आहे. मुख्य म्हणजे कलानगर जंक्शन येथील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प ही अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

मुंबईकरांचा प्रवास बऱ्यापैकी सुकर आणि सुसाट होणार

नागपूर ते इगतपुरी काही तासांत -

राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर अंतर खूपच मोठे असून आज हा प्रवास करण्यासाठी 17 तासाहून अधिक काळ लागतो. पण 2022 पासून हा प्रवास केवळ 8 तासात पूर्ण होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. 701 किमीच्या या महामार्गाचे काम वेगात सुरु आहे. तर आनंदाची बाब म्हणजे या मार्गातील दोन टप्पे नव्या 2021 मध्ये सुरू होणार आहेत. 520 किमीचा नागपूर ते शिर्डी मार्ग मे 2021 मध्ये वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. तर 623 किमीचा नागपूर ते इगतपुरी टप्पा डिसेंबर 2021मध्ये सुरू होणार आहे. राज्याच्या दृष्टीने हे टप्पे वाहतूक सेवेत दाखल होणे म्हणजे मोठी उपलब्धी असणार आहे.

नव्या हँकॉक ब्रिजची प्रतीक्षा संपणार -

माझगाव येथे भायखळा आणि सॅण्डहर्स्ट रोडला जोडणारा असा हँकॉक ब्रिज होता. हा ब्रिज 150 वर्षे जुना होता. या ब्रिटिशकालीन ब्रिजची उभारणी 1879मध्ये करण्यात आली होती. तर याची डागडुजी 1923 मध्ये करण्यात आली होती. पण हा ब्रिज जुना आणि धोकादायक झाल्याचे म्हणत रेल्वेने 2016 मध्ये पाडला. यानंतर याच ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार होता. पण हा पूल काही झाला नाही. प्रकरण अगदी न्यायालयापर्यंत गेले. या पुलावरून मोठा वाद सुरू झाला. पण शेवटी न्यायालयाच्या आदेशानुसार काम सुरु झाले. आता मे 2021 मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तर जून 15 पर्यंत हा पूल वाहतूकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. हा पूल खुला झाल्यास काही मिनिटांत भायखळा ते सॅण्डहर्स्ट रोड प्रवास पूर्ण करता येणार आहे. आज हा प्रवास मोठा वळसा घालत आणि वेळ वाया घालत करावा लागत आहे. तेव्हा हा पूल येथील नागरिकांसाठी मोठ गिफ्ट ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details