महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिलासादायक.. मुंबईत आज नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जवळपास दुप्पट - मुंबई कोरोना

मुंबईत आज 3 हजार 925 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 48 हजार 624 वर पोहचला आहे. आज 89 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 13 हजार 161 वर पोहचला आहे. 6 हजार 380 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 72 हजार 431 वर पोहचली आहे.

new coronavirus cases reduced in mumbai
new coronavirus cases reduced in mumbai

By

Published : Apr 30, 2021, 8:35 PM IST

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात घट होताना दिसत आहे. आज 3,925 नवे रुग्ण आढळून आले असून 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 6,380 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नव्या रुग्णांच्या प्रमाणात डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे.

6 हजार 380 रुग्णांना डिस्चार्ज -


मुंबईत आज 3 हजार 925 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 48 हजार 624 वर पोहचला आहे. आज 89 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 13 हजार 161 वर पोहचला आहे. 6 हजार 380 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 72 हजार 431 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 61 हजार 433 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 87 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 112 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 117 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 43 हजार 525 तर आतापर्यंत एकूण 54 लाख 23 हजार 998 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट -


मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या -


गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163, 5 एप्रिलला 9857, 6 एप्रिलला 10030, 7 एप्रिलला 10428, 8 एप्रिलला 8938, 9 एप्रिलला 9200, 10 एप्रिलला 9327, 11 एप्रिलला 9989, 12 एप्रिलला 6905, 13 एप्रिलला 7898, 14 एप्रिलला 9925, 15 एप्रिलला 8217, 16 एप्रिलला 8839, 17 एप्रिलला 8834, 18 एप्रिलला 8479, 19 एप्रिलला 7381, 20 एप्रिलला 7214, 21 एप्रिलला 7684, 22 एप्रिलला 7410, 23 एप्रिलला 7221, 24 एप्रिलला 5888, 25 एप्रिलला 5542, 26 एप्रिलला 3876, 27 एप्रिलला 4014, 28 एप्रिलला 4966, 29 एप्रिलला 4192, 30 एप्रिलला 3925 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -


मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details