मुंबई -मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third Wave of Corona Mumbai ) आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. आज शुक्रवारी २०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार असे सलग तीन दिवस शून्य मृत्यूची नोंद झाली होती, आज शुक्रवारी १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १७८० सक्रिय रुग्ण आहेत.
- २०२ नव्या रुग्णांची नोंद
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (१८ फेब्रुवारीला) २०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ३६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५५ हजार १९३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३३ हजार ८६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १७८० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २६२७ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०३ टक्के इतका आहे.
- ९७.७ टक्के बेड रिक्त
मुंबईत आज आढळून आलेल्या २०२ रुग्णांपैकी १७६ म्हणजेच ८७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज २६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ८ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६,३१९ बेडस असून त्यापैकी ८३८ बेडवर म्हणजेच २.३ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९७.७ टक्के बेड रिक्त आहेत.
- रुग्णसंख्या घटतेय