मुंबई - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. काल बुधवारी २२९३ रुग्णांची नोंद झाली होती. आज गुरुवारी त्यात किंचित वाढ होऊन २३६६ रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी २ मृत्यूची नोंद झाली होती. आज पुन्हा २ मृत्यूची नोंद झाली आहे. आठवडाभरात तिसऱ्यांदा २ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ५३८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण ऑक्सिजनवर, १०४ रुग्ण आयसीयूमध्ये तर १० रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
१५.११ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह -मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १५ हजार ६५६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २३६६ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १५.११ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. १७०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ८८ हजार २४८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ५५ हजार ६६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३ हजार ५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४१९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१६३ टक्के इतका आहे.
वयोवृद्ध महिलेचा मृत्यू -मुंबईत आज कोरोनामुळे २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला एक व्यक्ती ८५ वर्षाचा असून त्याला मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार होते. दुसरा रुग्ण ४० वर्षाचा असून त्याला दीर्घकालीन आजार नव्हते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.