मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आहे. असे असले तरी मंगळवारी 678 नव्या रुग्णांची ( new corona cases in Maharashtra ) नोंद झाली आहे. तर 35 रुग्णांचा मृत्यू ( corona deaths in Maharashtra ) झाला आहे. तर 942 रुग्णांना ( 942 corona patients discharged ) डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के ( corona recovery rate in Maharashtra ) तर मृत्युदर ( corona death rate in Maharashtra ) 2.12 टक्के इतका आहे.
हेही वाचा-Anil Deshmukh : अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर कुटुंबासह दाखल
7,555 सक्रिय रुग्ण -
आजतागायत राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 35 हजार 658 वर पोहोचला आहे. तर आजतागायत मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 997 वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 83 हजार 435 वर पोहोचला आहे. रुग्णांचे निदोन होण्यासाठीआजपर्यंत एकूण 6 कोटी 55 लाख 11 हजार 394 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.13 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 83 हजार 421 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 7 हजार 555 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.