महाराष्ट्र

maharashtra

Pune School Bouncers Case : पुण्यातील 'त्या' शाळेच्या संचालक व बाउन्सरवर गुन्हा दाखल करा - डॉ. नीलम गोऱ्हे

By

Published : Mar 16, 2022, 3:18 PM IST

पुण्यातील खासगी शाळेत ( Bouncers Hit School Student Parents In Pune ) पालकांना झालेल्या मारहाण प्रकरणात शाळा संचालक व बाउन्सरवर गुन्हा दाखल करावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe Order To Take Action Against Bouncers ) यांनी दिले आहेत. तसेच खासगी शाळांमध्ये बाउन्सर नेमण्याची वेळ का येते, याबाबत चौकशी होणे अत्यावश्यक आहे, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad Reaction On Pune Bouncers Case ) यांनी दिली.

Pune School Bouncers Case
Pune School Bouncers Case

मुंबई - पुण्यातील खासगी शाळेत ( Bouncers Hit School Student Parents In Pune ) पालकांना झालेल्या मारहाण प्रकरणात शाळा संचालक व बाउन्सरवर गुन्हा दाखल करावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe Order To Take Action Against Bouncers ) यांनी दिले आहेत. तसेच राज्यातील सर्व खासगी शाळांनी पालक आणि विद्यार्थी यांना अतिशय सामंजस्याने वागविण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना फी अभावी शाळेतून घरी ठेवू नये, अथवा त्यासाठी पालकांना नाहक त्रास देऊ नये, याकरिता शालेय शिक्षण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सुचना डॉ. गोऱ्हे यांनी केल्या आहेत. या संदर्भात विधानभवनात बैठक बोलवण्यात आली होती, या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

डॉ. नीलम गोऱ्हेंनी दिल्या 'या' सूचना -

  • महापालिकेच्या शिक्षणाधिकारी यांनी सादर केलेला अहवाल स्वीकारून त्यावर पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे.
  • पालकांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर संबंधित बाउन्सर पुरवठा करणारी खासगी संस्था आणि शाळा प्रशासन यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
  • शाळा प्रशासनाने पालकांना शाळेत भेटण्याच्या वेळा निश्चित करून संपर्क व्यक्तीचे नाव आणि संपर्क क्रमांक शाळेच्या दर्शनी भागात पालकांना ठळक दिसेल, अशा पद्धतीने लावण्यात यावे.
  • अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्याना पूरक सोयी सुविधा आहेत किंवा नाही, अशा शाळांवर जर कायदेशीर कारवाई होणार असेल तर तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर शाळेत सहभागी करून घेण्यात यावे.
  • या प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याबाबत पालकांना माहिती दिली पाहिजे. पुणे शहरात झालेल्या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाने तपशीलवार माहिती घेऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात यावेत.
  • शाळांमध्ये बाउन्सर नेमण्याऐवजी इतर पर्याय काय करता येतील, याबाबत विचार करण्यात यावा. शाळा–पालक संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने यावर काम करीत असून त्यांना अधिक बळ मिळण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने तक्रार निवारण समितीमध्ये पालकांचे प्रतिनिधित्व १० टक्के करण्यात येईल का याबाबत तपासणी करावी.
  • शाळांचे व्यवस्थापन आणि पालक यांच्यासाठी विभागीय स्तरावर माहिती कार्यशाळा घेण्यात याव्यात. पनवेल, पुणे परिसरातील काही खाजगी शाळांच्या तक्रारी आल्या असून त्यांची सखोल चौकशी करून वेळ पडल्यास विधान परिषदेमध्ये याबाबत लक्षवेधी सूचना मांडण्यात येईल, असे आज डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

शालेय शिक्षणमंत्र्यांनीही दिली प्रतिक्रिया -

यासंदर्भात बोलताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad Reaction On Pune Bouncers Case ) यांनी प्रतिक्रिया दिली. खासगी शाळांमध्ये बाउन्सर नेमण्याची वेळ का येते, याबाबत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. अशा प्रकारच्या गैरवर्तन करणाऱ्या राज्यातील शहरी भागातील अनेक शाळांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आलेल्या असून त्यांचा आढावा घेण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच पुणे, रायगड आणि मुंबई मधल्या काही खासगी शाळांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आलेल्या असून शासनाला असलेल्या अधिकारांचा योग्य तो वापर करून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -काका-पुतण्या धार्जिण्या लोकांना सुभेदार मल्हारराव होळकर यांची भीती - गोपीचंद पडळकर

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details