मुंबई -राज्य सरकारने नुकताच विधवा महिलांचा अपमान होणार नाही. यासाठी पतीच्या निधनानंतर काढून घेण्यात येणारी प्रतीके न काढण्याचा निर्णय ( Maharashtra Government Widow GR ) घेतला. राज्य शासनाचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी ( Neelam Gorhe On Widow GR ) व्यक्त केली. मात्र, यावेळी त्यांनी धक्कादाय खुलासा केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास विधवा महिलांवर बलात्कार ( Neelam Gorhe Office Recived Letter Of Rape Threat ) करण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
पुण्यात बैठक घेऊन जनजागृती -विधवा महिलांच्या सन्मानासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढे यावे यासाठी शासनाने काढलेल्या दोन्ही शासन निर्णयांचे ग्रामपंचायतींनी चावडी वाचन करावे, असे आवाहन पुण्यामध्ये झालेल्या दहा जिल्ह्यांच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. या महिलांच्या पुनर्वसनासाठी समाजाने पावले उचलली पाहिजेत तसेच पती निधनानंतर प्रतीके काढून न टाकण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असेही या बैठकीत आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पती-पत्नी यांनी यासंदर्भात घोषणापत्र स्वतः भरून द्यावे असा निर्णयही घेण्यात आला.