मुंबई -क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरण सध्या राज्यातच नाही तर संपूर्ण देशात गाजत आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेते प्रयत्न करत आहेत. हा वैचारिक कचरा दिवाळी अगोदर साफ करावा लागेल, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावी पुणे पोलिसांना शरण येण्याची शक्यता
कोरोना महामारीतून आता कुठे जनता सावरत असताना राज्यात सध्या अनेक प्रश्न जनतेशी निगडित आहेत. परंतु जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी महाविकास आघाडीमधील नेते ड्रग्स प्रकरणात आरोपी असलेल्या आर्यन खानला वाचवण्याच्या मागे लागले आहेत, असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या ड्रग्स प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. प्रभाकर साईल हा साक्षीदार २२ दिवसानंतर अचानक काल समोर आला व त्याने या पूर्ण प्रकरणाला एक नवीन दिशा देण्याचे काम केले. या पूर्ण प्रकरणावर अगोदरपासून संशय घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या संशयावर आता शिक्कामोर्तब होतंय की काय? असा प्रश्नसुद्धा आता उपस्थित होताना दिसत आहे.