महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Jayant Patil : 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीने राज्याला अपंग केलयं'

दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडले आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP State President Jayant Patil ) यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा टोला लगावला.

Jayant Patil
Jayant Patil

By

Published : Jul 26, 2022, 4:44 PM IST

मुंबई -गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडले आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP State President Jayant Patil ) यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा टोला लगावला. राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार का करत नाही. ज्याअर्थी करत नाही त्याअर्थी त्यांच्यात मतभेद आहेत. जे लोकं जीवाभावाची शिवसेना सोडून गेले आहेत. त्यामुळे तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील, असे वाटत नाही. त्यामुळे मतभेदाची जास्त शक्यता आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.


गोर गरिबांचे प्रश्न कोण सोडवणार ? :या राज्यातील गोरगरीबांचे प्रश्न आज सुटण्याऐवजी वाढायला लागले आहेत. राज्यात पुरपरिस्थिती मोठी आहे. पुरामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. त्या भागात पालकमंत्री नाही. फक्त दोन मंत्री महाराष्ट्राला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रुपाने आहेत. परंतु त्यांच्यातील गुंता सोडवण्यातच त्यांचा जास्त काळ जात आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. राज्यात पुरपरिस्थिती असल्याने जनता हवालदिल झाली आहे. हे लोक पावसाळा संपेपर्यंत थांबले असते तर आमचे आघाडीतील मंत्री तिथे ठाण मांडून बसले असते आणि फार मोठी मदत लोकांना झाली असती. महाराष्ट्रात मंत्री नसल्याने जिल्ह्यात जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली आहे. हीच अवस्था लोकांना चिंता करायला लावणारी आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा -Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, बाळासाहेब ठाकरे....

ABOUT THE AUTHOR

...view details