मुंबई- विरोधकांनी ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवले आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला देत आहेत. मात्र, वयानुसार मॅच्युरिटी येते, मुख्यमंत्र्यांमध्ये ती आली आहे का ? हे तपासावे लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांमध्ये मॅच्युरिटी आलीय का हे तपासावे लागेल; शरद पवारांनी उडवली खिल्ली
विरोधकांच्या ईव्हीएमविरोधी आंदोलनाची खिल्ली उडवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला होता. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची चांगलीच खिल्ली उडवली.
विरोधकांच्या ईव्हीएमविरोधी आंदोलनाची खिल्ली उडवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला होता. यावर बोलताना पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. एखादे विशिष्ट वय झाल्यानंतर मॅच्युरिटी येते असे म्हणतात. मुख्यमंत्र्यांमध्ये ती आली आहे की नाही, ते मला माहिती नाही. ईव्हीएमबद्दल जे आक्षेप आहेत त्याचे निवडणूक आयोग बघेल. त्याबद्दल मुख्यमंत्री का अस्वस्थ होत आहेत? असा सवालही पवारांनी केला.
ईव्हीएम बाबतच्या विरोधकांच्या आक्षेपाची उत्तरे निवडणूक आयोगाने द्यावीत. मुख्यमंत्री ईव्हीएमची उत्तर देताहेत हे समजत नाही, अशा शब्दात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली.