महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MLAs behavioral in assembly : आमदारांनो वर्तनाबद्दल अंतर्मुख व्हा- उपमुख्यमंत्र्यांचे विधानसभेत खडे बोल - देवेंद्र फडणवीस वर्तवणूक सल्ला

कितीकदा काही सदस्यांकडून गैरवर्तन ( Bad behavioral of MLA in Assembly ) होऊन सभागृहाच्या प्रतिमेला तडा जातो. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यापुढे सभागृहाच्या प्रतिमेला तडा जाणार नाही, असे वर्तन सर्व सदस्यांनी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar to MLA for behavioral ) यांनी आज विधानसभेत केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत वक्तव्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत वक्तव्य

By

Published : Dec 28, 2021, 3:20 PM IST

मुंबई - आमदारानी आपल्या वर्तनाबद्दल अंतर्मुख व्हावे. सभ्याचार, शिष्टाचार, आदर्श आचारसंहितेचे पालन करून राज्यासमोर आदर्श ठेवावा, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Minister AJit Pawar in Assembly ) यांनी आज विधानसभेत आमदाराना चांगलेच ( Ajit Pawar on MLAs behavioral ) खडसावले.

राज्याच्या विधानसभेत नेहमीच नैतिकता ( Morality in MH assembly ) जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यासमोर शिष्टाचार आणि आदर्श आचारसंहितेचे पालन नेहमीच करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कितीकदा काही सदस्यांकडून गैरवर्तन ( Bad behavioral of MLA in Assembly ) होऊन सभागृहाच्या प्रतिमेला तडा जातो. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यापुढे सभागृहाच्या प्रतिमेला तडा जाणार नाही, असे वर्तन सर्व सदस्यांनी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar to MLA for behavioral ) यांनी आज विधानसभेत केले.

हेही वाचा-Gopal Shetty Arrested: भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

नितेश राणे आणि भास्कर जाधव यांच्या सभागृहातील वर्तनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. अशा पद्धतीचे वर्तन करू नये यासाठी, अध्यक्ष गटनेते, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांची आज एक बैठक ( important meeting in Assembly ) झाली. या बैठकीनंतर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची पुस्तिका सर्वांना देऊन त्याप्रमाणे वर्तन अपेक्षित आहे, असे सभागृहात सांगण्यात आले.

हेही वाचा-MH Assembly Speaker Election 2021 : राज्यपालांच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना प्रतिउत्तर; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती

कुत्र्या, मांजरांना प्रतिनिधित्व करत नाही-

आपण राज्यातील लाखो मतदारांचे प्रतिनिधित्व या सभागृहात आमदार म्हणून करीत असतो. आपण कुत्रा किंवा मांजर यांचे प्रतिनिधित्व येथे करत नाही. त्यामुळे प्राण्यांचे आवाज काढून आपले गैरवर्तन दाखवू नका, असे खडे बोल उपमुख्यमंत्री पवार यांनी सभागृहात ( Ajit Pawar Slammed MLAs for behavioral ) काढले. तसेच सर्व आमदारांनी आपल्या वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करावा. सभागृहात सभागृहाच्या प्रांगणात शिष्टाचार आणि सभ्यतेला धरून वर्तन करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

हेही वाचा-Anil Deshmukh Judicial Custody : अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; 10 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढ


अध्यक्षांनी कुणालाही 12 महिन्यांची शिक्षा देऊ नये - उपमुख्यमंत्री
सभागृहात चुकणाऱ्या सदस्यांना योग्य शिक्षा करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. त्यानुसार अध्यक्षांनी सदस्यांना छोटी-मोठी शिक्षा करायला हवी. मात्र, त्यासाठी कुणालाही बारा 12 महिन्यांची शिक्षा करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


सभागृहाचा दर्जा कायम ठेवा - देवेंद्र फडणवीस
अजित पवार यांनी केलेल्या निवेदनाला समर्थन देत सभागृहाचा दर्जा कायम ठेवावा, असे आवाहन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केले. तसेच सदस्यांना देण्यात आलेल्या पुस्तिकेमध्ये आणखी काही वर्तनाचे नियम जोडून नव्याने सदस्यांना पुस्तिका देण्यात याव्यात, अशी पुस्तीही विरोधी पक्षनेते फडणवीस ( Devendra Fadnavis on MLAs behavioral ) यांनी केली. जेणेकरून सभागृहाबाहेरही कसे वर्तन करावे याचे त्यांना आकलन होईल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

विधानसभेत काय झाला होता वाद?

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपतर्फे सरकार विरोधात विधान मंडळाच्या पायर्‍यांवर बसून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या प्रवेश यादरम्यान त्यांना म्याऊ, म्याऊ बोलून नितेश राणे यांनी खिल्ली उडविली होती. या संदर्भामध्ये शिवसेना आमदार सुनील प्रभू ( Sunil Prabhu on Nitesh Ranes behavior ) यांनी हा मुद्दा शुक्रवारी विधानसभेत उपस्थित केला होता. विधान सभेतच नाही तर भवनाच्या परिसरामध्ये कोणी असभ्य वर्तन केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी अध्यक्षांकडे मागणी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details