महाराष्ट्र

maharashtra

बिहार निवडणुकीसाठी शरद पवार मुख्य प्रचारक तर राष्ट्रवादीची ४० जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर

By

Published : Oct 8, 2020, 4:54 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे बिहारमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेना बिहारच्या निवडणुकीत उमेदवार देणार असल्याने ही निवडणूक चर्चेची ठरण्याची शक्यता आहे.

शरद पवार
शरद पवार

मुंबई-शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेही बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख प्रचारक म्हणून काम पाहणार आहेत. तर राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी तब्बल 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.


बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बिहारमध्ये कोणत्याही मित्र पक्षाशी युती करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बिहारमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, के. के. शर्मा, खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राजीव झा, नरेंद्र वर्मा, राजेंद्र जैन, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. जे. जोसेमन, फौजिया खान यांचा समावेश आहे. याशिवाय धीरज शर्मा, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, पुष्पेंद्र मलिक, सीमा मलिक, विरेंद्र सिंग, गोविंदभाई परमार, वेदपाल चौधरी, उमाशंकर यादव, एस. पी. शर्मा, मुरलीमनोहर पांडे, नवलकिशोर साही यांचा समावेश आहे. त्याचबरोबर स्टार प्रचारकांमध्ये राहत काद्री, जितेंद्र पासवान, ललिता सिंग, संजय केशरी, इस्तियाक आलम, अकबर अली, मनोज जैस्वाल, खुशारो आफ्रीदी, ब्रिजबिहारी मिश्रा, शकील अहमद, अझर आलम, इंदू सिंग, चांदबाबू रहेमान, चंद्रेश कुमार, चंद्रशेखर सिंग आदींचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेना बिहारच्या निवडणुकीत उमेदवार देणार असल्याने ही निवडणूक चर्चेची ठरण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details