महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

NCP Meeting In Mumbai : नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, मात्र कार्यभार इतर मंत्र्यांकडे

कुर्ल्यातील विवादित जमीन खरेदी प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. पण नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. मात्र त्यांच्याकडे असलेली जबाबदारी इतर मंत्र्यांकडे दिली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

नवाब मलिक
नवाब मलिक

By

Published : Mar 18, 2022, 8:47 AM IST

Updated : Mar 18, 2022, 9:20 AM IST

मुंबई -कुर्ल्यातील विवादित जमीन खरेदी प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. पण नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. मात्र त्यांच्याकडे असलेली जबाबदारी इतर मंत्र्यांकडे दिली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे

सध्या नवाब मलिक यांच्याकडे गोंदिया आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यापैकी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात येणार असून, गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे देण्यात यावी याबाबतची चर्चा बैठकीत झाली. यासोबतच नवाब मलिक हे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र सध्या ते अटकेत असल्यामुळे या विभागाची जबाबदारी इतर कोणत्या मंत्र्याकडे दिली जाऊ शकते याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतर संबंधित खात्याची जबाबदारी इतर मंत्र्याकडे वळवली जाणार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कौशल्य विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी आरोग्य मंत्री राजेश टोपे तर अल्पसंख्यांक विभागाची अतिरिक्त जबाबदारी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला जाणार असून, मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतर संबंधित खात्याची जबाबदारी इतर मंत्र्याकडे वळवली जाणार आहे. तसेच नवाब मलिक हे बिनखात्याचे मंत्री म्हणून राज्य सरकार मध्ये राहतील अशीही माहिती मिळत आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा संशय ही यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

इतर निर्णय 31मार्च नंतर

31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत असते. मात्र नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांच्या खात्या संदर्भात तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे इतर निर्णय 31मार्च अधिक घेण्याचे गरजेचे असून त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवाब मलिक यांच्यावर असलेली जबाबदारी इतर मंत्र्यांकडे देण्याची चर्चा बैठकीत झाली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून, या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अर्थमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

पेन ड्राइवची सत्यता पडताळणे गरजेचे

कथित पोलीस बदली घोटाळ्यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी विधानसभेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला होता. त्या, पेन ड्राईव्ह मध्ये असलेल्या व्हिडिओ आणि ऑडिओ ची सत्यता पडताळणे गरजेचे आहे. सत्यता न तपासतात लोकांसमोर असे पेन ड्राईव्ह ठेवण्यात चुकीचा असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणीस यांना या वेळी लगावला. तसेच एखादा वकील त्याच्या घरामध्ये एखादं वक्तव्य करत असेल तर त्याचा या सर्व प्रकरणाशी कितपत संबंध येतो असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

म्हणजे 2024 पर्यंत राज्यात आमची सत्ता

2024 नंतर महाराष्ट्रात सत्तापालट होईल असं विधान नागपूर मध्ये देवेंद्र फडणीस यांनी केलं. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, म्हणजेत विरोधी पक्षाला देखील राज्यात महा विकास आघाडीचे सरकार 2024 पर्यंत राहणार हे नक्की झाल आहे. तसेच विरोधात बसले आहात तर, योग्य विरोधक म्हणून काम करा असा सल्लाही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

हेही वाचा - Happy Holi 2022 : रंगात नाहून निघाव फक्त रंगाचा बेरंग नको; ऐका ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

Last Updated : Mar 18, 2022, 9:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details