मुंबई -मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात तत्परता दाखवली नाही. 'मुख्यमंत्र्यांना राज्य सांभाळता येत नसेल तर, त्यांनी सत्ता सोडावी, आम्ही वेटिंगवर आहोत' असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. त्या वक्तव्याला शरद पवारांनी उत्तर देत 'वेटिंग वर राहणारी लोक, वेटिंगवरच राहतील' असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला. या पाहणी दौऱ्यानंतर पूरग्रस्त भागाची पाहणी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी देखील केली होती. या पाहणी दौऱ्यानंतर नारायण राणे हे पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. पूरग्रस्त भागात तातडीने मुख्यमंत्री यांनी मदत पाठवली नाही, असा ठपका या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर ठेवला. तसेच राज्यातले सरकार चालवता येत नसेल, तर सत्ता सोडा आम्ही वेटिंगवरच बसलो आहोत, अशी मिश्किल टीका त्यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले असून 'जी लोकं वेटिंगवर आहेत त्यांची दखल लोक घेत नसतात, ती लोकं वेटिंगवरचं राहतात' असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला आहे. आजश (मंंगळवारी) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'उद्धव ठाकरेंनी देशपातळीवर नेतृत्व केलं तर चांगलंच वाटेल'
उद्धव ठाकरे हे केवळ राज्यातच नाही तर, देशातही नेतृत्व करू शकतील अशी स्तुतीसुमने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उधळली आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, जर महाराष्ट्रातील नेतृत्व मोठं होऊन देशात नेतृत्व करत असेल आणि या नेतृत्वाला लोक साथ देत असतील तर त्याचा आपल्याला आनंद होईल, असे शरद पवार म्हणाले.
'उद्या दिल्लीत ममता बॅनर्जी यांची भेट'