मुंबई -सर्वसामान्य कायद्याप्रमाणे अटकेत असलेल्या आर्यन खानचे देखील समुपदेशन करण्यात आले. प्रत्येक आरोपीने अमली पदार्थापासून दूर राहावे यासाठी कौन्सलिंग करण्यात येत असल्याची माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांनी दिली होती. मात्र, इलेक्ट्रॉनिक पुरावे दाखवणार्या एनसीबीने आर्यन खान यांचे काऊंन्सिलींग केल्याचा व्हिडीओ समोर आणावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्त नवाब मलिक यांनी दिले आहे. एनसीबी आर्यन खान याचे काऊंसिलिंग तुरुंगात जाऊन केले का? का हा देखील पब्लिसिटी स्टंट आहे? असे सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत.
प्रत्येकाचे केले जाते समुपदेशन
आर्यन खान याला एनसीबी (अंमली पदार्थ विरोधी पथक) कडून समुपदेशनाचे धडे देण्यास सुरुवात झाली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार हे समुपदेशनाचे धडे फक्त आर्यन खान यालाचं नाही. तर, प्रत्येक आरोपींना दिले जातात. विशेषतः लहान वयात जे युवा ड्रग्सच्या आहारी जातात त्यांना त्याच वयामध्ये त्याच्यातून बाहेर काढणं फार गरजेचं असतं आणि म्हणूनच त्यांचं समुपदेशन केले जाते.
हेही वाचा -एनसीबीचा पंच किरण गोसावीच्या महिला अस्टिस्टंटला पुणे पोलिसांकडून अटक