मुंबई- क्रूझ ड्रग केस प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आर्यनचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम आता अजून वाढला आहे. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालाय दाखल करणार असल्याची माहिती आर्यन खानचे वकील अली काशीद देशमुख यांनी दिली आहे. मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट या दोघांचाही जामीन नामंजूर झाला आहे. यामुळे या तिघांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते.
- एनसीबीकडून Whats App चॅट कोर्टात सादर -
आर्यन खान याचे Whats App चॅट कोर्टात सादर केल्याची माहिती एनसीबीने दिली. पोलिसांना आर्यन खान याच्या व्हाँट्सअप चॅटमध्ये कथीतरित्या ड्रग्जशी संबंधीत काही पुरावे सापडले आहेत. तो एका अभिनेत्रीशी बोलताना हे चॅट झाले असल्याचा एनसीबीचा दावा आहे.
आर्यन खानला क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून सध्या तो जेलमध्ये आहे. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान एनसीबीने जामीनाच्या सुनावणीआधी आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅटिंग केल्याची माहिती कोर्टात दिली आहे. एनसीबीने हे संभाषण कोर्टात सादर केलं आहे. गेल्या सुनावणीत एनसीबीने कोर्टात ही माहिती दिली आहे. या अभिनेत्री आणि आर्यन खानमध्ये अनेकदा ड्रग्जवरुन चॅटिंग झालं आहे. याआधी एनसीबीने आर्यन खानचं काही ड्रग्ज तस्करांसोबत संभाषण झाल्याचे पुरावे दिले होते.
हेही वाचा -सर्व आरोपींप्रमाणेच आर्यन खानचेही समुपदेशन - समीर वानखेडे
एनसीबीने आर्यन खानच्या मोबाइलमधील चॅटिंग तपासलं असून याआधीही अनेक संभाषणांचा उल्लेख केला आहे. दरम्यान यावेळी आर्यन खानने एका नवोदित अभिनेत्रीसोबतही ड्रग्जसंबंधी चॅट केलं होतं असं समोर आलं आहे. २ ऑक्टोबरला झालेल्या क्रूझ पार्टीतल्या ड्रग्जसंबंधी दोघांमध्ये बोलणं झालं होतं. याच पार्टीनंतर आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेत नंतर अटकेची कारवाई केली होती. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. आज याप्रकरणी सुनावणी होऊन आर्यनसह दोन जणांचा जामीन नाकारण्यात आला आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट यांच्यासहित एकूण सहा जणांना एनसीबीने २ ऑक्टोबरला छापा टाकून ताब्यात घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती.
- कोण आहे आर्यन खान
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह इतर सात जणांना एनसीबीने अटक केली. आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट, मून मून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना यांचा समावेश.Body:
- पार्टीची माहिती नव्हती -
प्रतिक गाबा नावाच्या मित्राने फोनवरुन पार्टीची माहिती दिली. अतिमहत्वाच्या व्यक्तींना निमंत्रण येईल म्हणून, असे सांगितले होते. प्रतीक गाबा हा त्यानंतर फर्निचरवालासोबत संपर्कात होता. फर्निचरवाला योजकांच्या कायम संपर्कात होता. पार्टीत ग्लॅमर तडाका टाकावा, या निमित्ताने कदाचित मला पार्टीचं निमंत्रण दिले असावे. परंतु, त्याच्या कोणत्याही हालचालींची मला कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण आर्यन खान यांच्या वकीलांनी न्यायालयात दिले होते.
- कधी झाली अटक?