दीपिकाच्या उत्तराने एनसीबी अधिकाऱ्यांचे समाधान नाही - mumbai latest news
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिपीका पदुकोन व तिची मॅनेजर करिष्मा प्रकाश यांच्या दरम्यान घडलेल्या व्हाट्सअप चॅट बद्दल अनेक प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना दीपिकाने हे व्हाट्सअप चॅट करिष्मा प्रकाश सोबत झाल्याचे मान्य केले. मात्र हे चॅट अमली पदार्थांसाठी नसल्याचे दिपीका व करिश्मा यांनी एनसीबीला सांगितले आहे.
मुंबई-बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची तब्बल साडे पाच तास चौकशी केल्यानंतर तिला घरी जाऊ देण्यात आले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिपीका पदुकोन व तिची मॅनेजर करिष्मा प्रकाश यांच्या दरम्यान घडलेल्या व्हाट्सअप चॅट बद्दल अनेक प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना दीपिकाने हे व्हाट्सअप चॅट करिष्मा प्रकाश सोबत झाल्याचे मान्य केले. मात्र हे चॅट अमली पदार्थांसाठी नसल्याचे दिपीका व करिश्मा यांनी एनसीबीला सांगितले आहे. आम्ही विड, हॅश नावाचे कोड वापरून संवाद साधायचो, मात्र अमली पदार्थाचा याच्याशी संबंध नसल्याचे दोघींनी म्हटले आहे. दीपिका पदुकोण व तिची मॅनेजर करिष्मा प्रकाश यांच्या चौकशीतून मिळालेल्या उत्तराने एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे समाधान झाले नसल्याची माहिती आहे.