मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग्स सिंडिकेटचा तपास करणार्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) आणखीन एकाला अटक करण्यात आलेली आहे. हिमाचल प्रदेशमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान राहील विश्राम या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीकडून उच्च प्रतीचे 1 किलो हशीश जप्त करण्यात आले असून, याबरोबरच 4 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात चार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. राहील हा शोविक चक्रवर्ती व रिया चक्रवर्ती यांच्या संपर्कात असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबरोबरच बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील इतर व्यक्तींच्या संपर्कात राहून अमली पदार्थांचा पुरवठा करण्याचे काम राहील करत असल्याचेही सांगण्यात येत आहे.