मुंबई-कॉर्डिया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने कारवाई करत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर एनसीबीकडून सतत अटक सत्र सुरुच आहे. मंगळवारी विविध ठिकाणावरून उशिरा रात्रीपर्यंत एनसीबीने नऊ जणांना अटक केली आहे. यातून चार आरोपींना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. उर्वरित पाच आरोपीपैकी आज एनसीबीकडून चार आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर मंगळवारी रात्री पवई येथून एकाला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. यामुळे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता १७ वर पोहोचली आहे.
बुधवारी चार आरोपींना न्यायालयात हजर करणार!
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डिया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई करत १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त केले आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
कॉर्डिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आतापर्यंत १७ जणांना अटक !
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डिया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई करत १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त केले आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आज आणखी 9 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे.
या आठही जणांना न्यायालयात हजार केले असता ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. या आठ जणांची एनसीबीकडून कसून चौकशी केली जात आहे. मंगळवारी विविध ठिकाणावरून उशिरा रात्रीपर्यंत एनसीबीने नऊ जणांना अटक केली आहे. यातून चार आरोपींना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. उर्वरित पाच आरोपीपैकी आज एनसीबीकडून चार आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बुधवारी नऊ जणांना अटक -
एकीकडे एनसीबीकडून ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी केली जात असताना आणखी काही जणांची नावे समोर आली आहेत. त्यानुसार अब्दुल शेख, श्रेयस नायर, मनीष दर्या आणि अविन शाहू या चार जणांना एनसीबीने मंगळवारी अटक केली होती. या चौघांना जेजे रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. त्यांना काल कोर्टात हजर केले असता त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. काल एनसीबीने अनेक ठिकाणी छापे मारून रात्री पवई परिसरातून आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन एनसीबी कार्यालयात नेले. अचिंत कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे, त्याला मुंबईच्या पवई परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे, त्याच्याकडून काही प्रमाणात औषधेही जप्त करण्यात आली आहेत. यामुळे याप्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता १७ वर पोहोचली आहे.
हेही वाचा - 'या' तिघांना सर्वात अगोदर केली अटक, ड्रग्ज पार्टीतील मूनमून धामेचा कोण?
हेही वाचा - सुपरस्टार शाहरुख खान म्हणाला होता... आर्यन ‘बॅड बॉय’ झालेला मला नक्की आवडेल