महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एनसीबीची मुंबईत कारवाई; अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त - drugs seized news

मुंबईत केलेल्या कारवाईदरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एक किलो कोकेन, 2 किलो पीसीपी, 29 किलो 300 ग्राम एमडी व 70 ग्राम मेफेड्रोन जप्त केल आहे.

Drug dealer arrested in Mumbai
मुंबईत ड्रग्स डीलरला अटक

By

Published : Oct 16, 2020, 7:53 AM IST

मुंबई- मुंबईतील वांद्रे, पाली हिल, जुहू, खार व अंधेरी भागात अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणाऱ्या आरोपींच्या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई केली. यामध्ये काही ड्रग्स डीलरला अटक करण्यात आलेली आहे. याबरोबरच या परिसरात अमली पदार्थांचा मोठा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने जप्त केला आहे.

मुंबईत केलेल्या कारवाईदरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एक किलो कोकेन, 2 किलो पीसीपी, 29 किलो 300 ग्राम एमडी व 70 ग्राम मेफेड्रोन जप्त केल आहे. याप्रकरणी केलेल्या कारवाईत प्रदीप राजाराम सहानी याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली असून त्याच्याकडे 70 ग्राम मेफेड्रोन सापडल आहे. प्रदीप हा अंधेरी पश्चिम परिसरातून अमली पदार्थांचा व्यवसाय करत होता. महत्त्वाचं म्हणजे बालाजी टेलीफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये प्युन-रनर म्हणून एका एजन्सीमार्फत प्रदीप सहानी हा काम करत होता. यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.

एनसीबीकडून जम्मू-काश्मीर येथून 56 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फारुख शेख हा मुंबईतला असल्याकारणाने त्यास मुंबईतून अटक करण्यात आलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details