महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संपूर्ण प्रकरणाचा छडा लागत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहणार - नवाब मलिक यांचा इशारा

वानखेडे यांच्या बोगस कारवाई प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. आता बदली झाली असली तरी, लढाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिला. तसेच, वानखेडे यांची बदली केली ( nawab malik comment on Sameer Wankhede transfer ), ते योग्य असल्याचे मलिक म्हणाले.

nawab malik on Sameer Wankhede transfer
समीर वानखेडे बदली

By

Published : Jan 3, 2022, 7:28 PM IST

मुंबई - एनसीबी मुंबईचे प्रमुख अधिकारी समीर वानखेडे यांची बदली ( nawab malik comment on Sameer Wankhede transfer ) करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज मौन सोडले. वानखेडे यांच्या बोगस कारवाई प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. आता बदली झाली असली तरी, लढाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिला. तसेच, वानखेडे यांची बदली केली, ते योग्य असल्याचे मलिक म्हणाले.

हेही वाचा -Prem Chopra COVID Positive : प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण, लीलावतीत उपचार सुरू

..हा विषय धसास लावणार

एनसीबीमध्ये आल्यानंतर फर्जीवाडा करून अनेक चांगल्या लोकांना चुकीच्या पद्धतीने जेलमध्ये टाकले. नोकरी मिळवण्यासाठी फर्जी प्रमाणपत्र देऊन नोकरी घेतली. कमी वयात बारचे लायसन्स घेतले, ही सगळी प्रकरणे उघड केली. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या शिवाय खंडणीच्या प्रकरणात दोन एसआयटी तपास करत आहेत. दिल्ली विजिलन्स समितीकडे तक्रार केल्यानंतर त्यांचे उत्तरही आले आहे. प्रथमदर्शनी वानखेडे यांनी सर्व्हिस कोडचे उल्लंघन केले आहे, हे स्पष्ट होते आहे. या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करून हा विषय धसास लावणार असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.

समीर वानखेडेला ( Sameer Wankhede transfer ) मुदतवाढ मिळावी, याकरिता दिल्लीत लॉबिंग करण्यात येत होते. हे आधीच जाहीर केले होते. त्यानंतर रात्री वानखेडेला बदलण्यात आल्याचे समजले. लॉबिंग करणार्‍या व्यक्तीने माघार घेतली, हे यावरून स्पष्ट होते, असे मलिक यांनी सांगितले. तसेच, मुदतवाढ दिली असती तर, संपूर्ण माहिती घेऊन प्रकरण उघड केले असते, असे ते म्हणाले.

पोलिसांनी कारवाई करावी

आर्यन खान प्रकरणात दोन्ही एसआयटी तपास करत आहेत. त्यात काही अडचण येत असेल, तर त्याचीही विचारणा करण्यात येईल. प्रभाकर साहीलने प्रतिज्ञापत्राद्वारे सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे, यंत्रणा त्या घटनेचा योग्य तो तपास करून कारवाई करेल, असेही नवाब मलिक म्हणाले. जाताना माझ्याबाबतीत वेगळा प्रकार घडवण्याचा प्रकार होता. पोलिसांकडे माझ्या विरोधात तक्रार मेलद्वारे केली असेल तर, माझ्याशी चौकशी करा किंवा माझ्याविरोधात कुठल्या अधिकार्‍याने तक्रार करण्यास कुणाला प्रोत्साहित केले, त्यावर मुंबई पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्वारे करणार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

मोदींना माफ करणार नाही

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदींबाबत गौप्यस्फोट केला आहे. त्यावरही मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींचे ते विधान योग्य नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे, तीन कृषी कायदे वेळेवर मागे न घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा केलेल्या आंदोलनात मृत्यू झाला. शेतकऱ्यांचे वर्षभर आंदोलन झाले. लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहमंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांचे हत्याकांड घडवले. त्या विरोधात आता चार्जशीट दाखल झाली आहे. मात्र, मोदी शेतकऱ्यांबाबत अशाप्रकारचे विधान करत असतील तर, हे योग्य नाही आणि हे सत्य असेल तर, जनता मोदींना माफ करणार नाही, असेही नवाब मलिक यांनी स्पष्टपणे बजावले.

हेही वाचा -Mumbai Schools Closed : मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद

ABOUT THE AUTHOR

...view details