मुंबई -नवाब मलिक यांच्याकडून ड्रग्स प्रकरणांमध्ये थेट देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच राज्यामध्ये होणाऱ्या ड्रग्सच्या व्यापाऱ्यांमध्ये भाजपाचे नेते क्लीन आल्याचा दावा नवाब मालिकांकडून पत्रकार परिषदेतून केला जात आहे. नवाब मालिकांच्या या भूमिकेचे समर्थन मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाने देखील केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नवाब मलिक अजूनही आक्रमक होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.
मंत्रिमंडळाच्या पाठिंब्यानंतर नवाब मलिक अजूनच आक्रमक होणार ? - etv bharat maharshtra
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे रोज ड्रग्स प्रकरणावरून भारतीय जनता पक्षावरच्या नेत्यांवर आरोपाच्या फेर्या चढवत आहेत. ड्रग्स प्रकरणांमध्ये थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केला होता.
Nawab malik
देवेंद्र फडणवीस यांचे सूचक ट्विट
नवाब मलिक यांच्या खळबळजनक आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर उत्तर देणे टाळल. मात्र ट्विटच्या माध्यमातून त्यांनी नवाब मलिक त्यांना उत्तर दिले. "आपण डुकरा सोबत मस्ती करू नये, डुकरा सोबत मस्ती केल्यास आपला अंगावर चिखल उडतो" असे सूचक ट्विट देवेंद्र फडणीस यांनी केलं होतं.
Last Updated : Nov 11, 2021, 5:27 PM IST