मुंबई -धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला ( Navneet Rana Arrest By Khar Police ) खार पोलिसांनी अटक केली होती. त्यांना वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची ( Navneet Rana Judicial Custody ) न्यायलयीन कोठडीसुनावली आहे. दरम्यान, खासदार राणा यांनी ( Navneet Rana wrote Letter To LS Speaker )लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला( Om Birla ) यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात नवनीत राणा ( Navneet Rana Alligation Police ) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मी अनुसूचित जातीची असल्याने मला पाणी सुद्धा दिले नाही, असं नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
नवनीत राणांचे पोलिसांवर आरोप -खासदार राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहत, रात्रभर पाणी न दिल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लिहिले की, 'मला 23 एप्रिल 2022 रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही. तसेच मला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची आहे. यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला.
'धार्मिक तणाव निर्माण करायचा हेतू नव्हता' - उद्धव ठाकरे यांनी जनतेचा अपमान करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली. यावरुन ते हिंदुत्वापासून पूर्णपणे दूर गेल्याचे दिसत आहे. शिवसेनेत हिंदुत्वाची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याच्या आशेने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आमचा हेतू नव्हता, असंही राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.