मुंबई -हनुमान चालीसावरून सुरू झालेल्या वादगावरून आज खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना ( Navneet Rana Arrest By Mumbai Police ) अटक केली आहे. चिथावणीखोर वक्तव्य आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. यावेळी नवनीत राणा यांची पोलिसांशी ( Navneet Rana Argument With Mumbai Police ) बाचाबाची झाली. तसेच नोटीस दिल्याशिवाय बाहेर पडणार नाही, असेही राणा यांनी पोलिसांना सुनावले होते.
काय म्हणाले नवनीत राणा? -महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का? असा संतप्त सवाल राणा यांनी पोलिसांना विचारला. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही सुद्धा काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो, आम्हाला अशा प्रकारे वागणूक दिली जाते, असेही ते म्हणाले. तसेच शिवसैनिकांवर सुद्धा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राणा दाम्पत्यानी केली.
राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल - राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणलं. अटकेनंतर आता त्यांना आजची रात्र पोलीस ठाण्यातच काढावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच राणा दाम्पत्यांना उद्या बांद्रा हॉलिडे कोर्टात हजर केलं जाणार आहे. खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून कलम 153(A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आज अटक करण्यात आल्यानंतर आज रात्र खार पोलीस स्टेशनमध्ये घालावी लागणार आहे.
शिवसैनिकांचा जल्लोष -नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचं कारण देत हनुमान चालीसा न म्हणण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर त्यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून टीकाही झाली. तसेच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरच जल्लोष केला. यानंतर दुपारी पोलीस नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या घरी पोहोचले. त्यांना पोलीस ठाण्यात नेणार होते. पोलीस अधिकाऱ्यांसह पथक घरी गेल्यानंतर राणा दाम्पत्यानं पोलीस ठाण्यात येणार नाही, असं स्पष्ट शब्दांत सांगितलं. त्यावर पोलीस अधिकारी त्यांच्याशी चर्चा करत होते. त्याचवेळी नवनीत राणा अचानक भडकल्याचे व्हिडिओमध्ये दिसतं. नियमाला धरून तुम्ही काम करा तुमचा आवाज खाली करा आवाज खाली करा. तुम्ही येथून निघून जाअसं त्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलताना व्हिडिओत पाहायला मिळालं. दुसरीकडे रवी राणा हे देखील कॅमेऱ्यासमोर संवाद साधत होते. आमच्यावर अन्याय होत आहे, हे सर्व जनता बघत आहे असं रवी राणा बोलत होते.
राणांना जामीन मिळणार का? -राणा दाम्पत्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या कलम 153(A) या गुन्हा अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये टेबल जामीन देता येत नाही जामिनासाठी रीतसर न्यायालयात अर्ज करून जामीन घ्यावा लागतो. मात्र, उद्या राणा दाम्पत्यांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली तरच त्यांना जामिनासाठी अर्ज करता येणार आहे. त्यांची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली, तर आणखी काही काळ जामिनासाठी वाट पाहावी लागणार आहे, असे कायदेतज्ञ अॅड. अनिकेत निकम यांनी सांगितले आहे. तसेच अजामिनपात्र गुन्हा असल्याने टेबल बेलचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे राणांनी जामिन घेतला नाही हा त्यांचा दावा खोटा असल्याचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी सांगितले.
खार पोलीस ठाण्यात रुग्णवाहिका दाखल
खार पोलीस स्टेशनमध्ये रुग्णवाहिका दाखल -राणा दाम्पत्याची आरोग्य तपासणीसाठी खार पोलीस स्टेशनमध्ये रुग्णवाहिका दाखल झाली आहे. येथे दोघांचीही आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा -Ravi Rana Called Off Protest : 'पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आंदोलन मागे घेत आहोत', राणा दाम्पत्याची घोषणा