महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Narhari zirwal on political crisis : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा एकनाथ शिंदे गटाला झटका, हा घेतला निर्णय

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ ( Reversal in The Politics of Maharashtra ) होत असताना नवनवीन घडामोडी समोर येताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel Leader Eknath Shinde ) यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ ( Vice President Narhari Jirwal ) यांना ३४ आमदारांच्या समर्थनाचे पत्र ( Letters of Support From MLA ) पाठवलं आहे. सात पानी पाठवलेल्या पत्रामध्ये ३४ आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत.

नरहरी झिरवळ
नरहरी झिरवळ

By

Published : Jun 23, 2022, 12:28 PM IST

Updated : Jun 24, 2022, 2:15 PM IST

मुंबई- आमदार अजय चौधरी यांची राज्य विधानसभेतील शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ मंजुरी दिली. यासंदर्भातील पत्र उपसभापती कार्यालयाकडून शिवसेनेच्या कार्यालयीन चिटणीसांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना झटका बसला आहे.

कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांनी हकालपट्टी झाल्यानंतर आपणच गटनेता असल्याचा दावा केला होता. त्यावर नरहरी झिरवळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्याकडे आलेली यादी संशयास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत आता कायदेशीर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्याकडे आलेली यादी संशयास्पद असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष यांनी सांगितले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता नाट्यात आता नवीन पैलू समोर आला आहे. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे. तर प्रपोजपदी सुनील प्रभू कायम आहेत. दरम्यान शिंदे यांच्या गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगत शिवसेना पक्षाचे प्रत्येक म्हणून भरत गोगावले यांचे नाव सुचवले आहे त्यांच्यासोबत 34 आमदारांची यादी पाठवली आहे.

यादी संशयास्पद झिरवाळ-मात्र ही यादी संशयास्पद असल्याचे सांगत नरहरी जिरवा यांनी भरत गोगावले यांच्या प्रकट नियुक्तीला मान्यता दिलेली नाही. या यादीत काही अपक्ष आमदार आहेत तर या यादीतील एक आमदार नितीन देशमुख यांनी आपली सही नाही असा दावा केला आहे. त्यांनी प्रत्यक्ष येऊन हा दावा केल्यामुळे यादी वरच आता संशय निर्माण झाला आ.हे त्यामुळे ही यादी आपण मान्य करणार नाही, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी प्रत्यक्ष हजर रहावे किंवा कसे याबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाची मान्यता कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ ( Politics of Maharashtra ) होत असताना नवनवीन घडामोडी समोर येताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे( Rebel Leader Eknath Shinde ) यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ ( Vice President Narhari Jirwal ) यांना ३४ आमदारांच्या समर्थनाचे पत्र ( Letters of Support From MLA ) पाठवलं आहे. सात पानी पाठवलेल्यापत्रामध्ये ३४ आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत.

प्रतोदपदी भरत गोगावले : एकीकडे शिवसेनेचे विधिमंडळ प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेना आमदारांना जारी केलेला व्हीप हा बेकायदेशीर असून, तो आम्हाला मान्य नाही, असे शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष यांना सांगितलेले आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी ( Chief Representative of MLA Bharat Gogavale ) निवड केली आहे, अशा आशयाचं ट्विटसुद्धा त्यांनी केलेले आहे. या सर्व घडामोडी होत असताना नक्की एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ किती आमदार त्यांच्यासोबत गुवाहाटी येथे आहे, याचा अंदाज बांधणे सर्वच राजकीय पक्षांना कठीण झाले असताना आता एकनाथ शिंदे यांनी त्या सर्व आमदारांच्या समर्थनाचे पत्र उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवून हा प्रश्न संपुष्टात आणलेला आहे.

Last Updated : Jun 24, 2022, 2:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details