मुंबई -उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh ambani) यांच्या घराजवळ विस्फोटक (Explosives) सापडल्याप्रकरणी विशेष एनआयए कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मुकेश अंबानी यांच्या घरी एक्सयूव्हीमध्ये स्फोटके सापडणे तसेच मनसुख हिरेन (Mansukh hiren murder) यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या क्रिकेट बुकी नरेश गौर याला जामीन देण्यात आला आहे.
क्रिकेट बुकी असलेल्या नरेश गौर (Cricket bookie naresh gaur) याला अटक केली होती. सिम कार्ड देण्याबाबत आणि कटात सहभागी होण्याबाबत त्याला अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान नरेश बुकी (Cricket bookie naresh gaur) संदर्भात एनआयएला महत्वपूर्ण कागदपत्रे मिळाले होते.