पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दाभोलकर हत्याप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढीस संमती दिली होती. यानंतर संबंधित मुदतवाढ बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी याचिका सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी उच्च न्यायालयात केली. यावर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली असल्याने दोनही आरोपींची कोठडी कायम आहे.
हेही वाचादाभोलकरांवर गोळीबार केल्याची कळसकरची कबुली, सीबीआयकडून न्यायालयात अहवाल सादर
दाभोलकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या या अगोदरच्या सुनावणीत खूनात वापरण्यात आलेले हत्यार खाडीत फेकून दिल्याची माहिती समोर आली होती. या हत्याराचे अवशेष शोधण्यासाठी परदेशातून डायव्हर्स बोलावणार असल्याचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले.
मात्र, या हत्या प्रकरणी तपास यंत्रणांचा सुरू असलेला तपास तसेच आता पर्यंतची प्रगती या बद्दल न्यायालयाने या आगोदारच नाराजी व्यक्त केली होती.