महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विधानसभा-मुंबई महापालिका समोर ठेवून नारायण राणेंची केंद्रात वर्णी, जाणून घ्या या मागची ६ कारणे

भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. बुधवारी (७ जुलै) केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्याआधी राणेंना दिल्लीचे बोलावणे आले असून ते तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यासोबतच मध्यप्रदेशातील पूर्वाश्रमीचे काँग्रेसी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याही गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. राणे आणि सिंधिया हे दोघेही पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आहेत.

narayan rane
नारायण राणे

By

Published : Jul 6, 2021, 2:19 PM IST

Updated : Jul 7, 2021, 5:18 PM IST

मुंबई - भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. बुधवारी (७ जुलै) केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याआधी राणेंना दिल्लीचे बोलावणे आले असून ते तातडीने दिल्लीकडे रवाना झाले होते. राणे यांना भाजपमध्ये जबाबदारी देण्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा रोजदार विरोध होता. तरीही राणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. यामागे भाजपची काय भूमिका आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे...

शिवसेनाविरोध हीच त्यांची जमेची बाजू

१) प्रदिर्घकाळ शिवसैनिक आणि शिवसेनेच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री राहिलेले नाराणय राणे यांना शिवसेनेचे अनेक बारकावे माहीत आहेत. त्यामुळे शिवसेनेवर प्रहार करण्यासाठी भाजप राणेंना मंत्रीपदाचे बळ देण्याची शक्यता आहे

२) महाराष्ट्रातील मराठा चेहरा म्हणून भाजप नारायण राणेंना यापुढे प्रोजेक्ट करणार अशीही शक्यता आहे.

३) आगामी विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असेल तर मराठा नेता सोबत असणे ही त्यांची प्राथमिक गरज राहाणार आहे. यासाठी नारायण राणे यांना भाजप केंद्रीय मंत्रीपदाचे बळ देत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

४) दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात अद्यापही धगधगत आहे. मराठा समाजाचे प्रश्न केंद्रात मांडणारा नेता म्हणूनही आगामी काळात राणेंकडे पाहिले जाण्याची शक्यता आहे.

५) राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई महानगर पालिका निवडणुक ही भाजपसाठी महत्त्वाची राहाणार आहे. महापालिका निवडणुकीतही नारायण राणेंचा भाजपला फायदा होऊ शकतो.

६) शिवसेनेचा गड फोडण्यासाठीही राणेंना मंत्रीपद दिल्यास भाजपला फायदा होईल.

Last Updated : Jul 7, 2021, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details